Congress MLA: "सुंदर मुलगी दिसली की मन भटकतं अन् अत्याचर होतो..." काँग्रेस आमदारानं तोडले अकलेचे तारे; घृणास्पद वक्तव्यावर भाजप आक्रमक VIDEO

Congress MLA Controversial Statement: बलात्कारासारख्या जघन्य गुन्ह्याला धार्मिक ग्रंथ, जातीची सुंदरता आणि आध्यात्मिक पुण्याची जोड देऊन बरैया यांनी एक नवीन वाद ओढवून घेतला.
Congress MLA Controversial Statement
Congress MLADainik Gomntak
Published on
Updated on

Congress MLA Controversial Statement: मध्य प्रदेशच्या राजकीय इतिहासातील अत्यंत खालच्या पातळीवरील वक्तव्य केल्याचा आरोप काँग्रेस आमदार फूलसिंग बरैया यांच्यावर होत आहे. बलात्कारासारख्या जघन्य गुन्ह्याला धार्मिक ग्रंथ, जातीची सुंदरता आणि आध्यात्मिक पुण्याची जोड देऊन बरैया यांनी एक नवीन वाद ओढवून घेतला. त्यांच्या या विधानामुळे केवळ मध्य प्रदेशातच नव्हे, तर संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली असून भाजपने याला काँग्रेसची "विकृत आणि दूषित मानसिकता" म्हटले.

एका व्हिडिओ मुलाखतीत बरैया यांनी बलात्काराचे समर्थन केल्यासारखे विधान केले. ते म्हणाले, "बलात्काराचा सिद्धांत असा आहे की, रस्त्यावरुन चालताना एखाद्या पुरुषाला अत्यंत सुंदर मुलगी दिसली, तर त्याचे मन भटकू शकते आणि त्यातून बलात्कार घडू शकतो." त्यांनी पुढे सौंदर्याला जातीशी जोडताना म्हटले की, "आदिवासी, अनुसूचित जाती (SC) आणि ओबीसी समुदायातील महिला अत्यंत सुंदर असतात, म्हणूनच त्यांच्यावर बलात्काराच्या घटना अधिक घडतात." महिलांवरील अत्याचाराला सौंदर्याचे कारण देणे, हे पीडितांचा अपमान करणारे असल्याची टीका होत आहे.

Congress MLA Controversial Statement
Madhya Pradesh Crime: वाघिणीचे नखं आणि दात कापले, काळ्या जादूने 'पत्नीला वश' करण्याचा प्रयत्न, मध्य प्रदेशातील धक्कादायक प्रकार

बरैया यांचे सर्वात धक्कादायक विधान म्हणजे बलात्काराला धार्मिक पुण्याशी जोडणे. त्यांनी दावा केला की, "काही धार्मिक ग्रंथांमध्ये असे निर्देश दिले आहेत की, विशिष्ट जातीच्या महिलेशी लैंगिक संबंध ठेवल्यास तीर्थयात्रेचे पुण्य मिळते. लोक तीर्थक्षेत्री जाऊ शकत नाहीत, म्हणून ते घरीच राहून हे 'पुण्य' मिळवण्यासाठी या महिलांना पकडून त्यांच्यावर अत्याचार करतात." 'रुद्रयामल तंत्र' नावाच्या पुस्तकाचा हवाला देत त्यांनी हे विधान केले आहे. गुन्हेगारांच्या मनात अशा आध्यात्मिक बक्षिसाची भावना असते, असा तर्क त्यांनी मांडला.

Congress MLA Controversial Statement
Madhya Pradesh High Court: अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्याला हायकोर्टाकडून जामीन मंजूर; घातली ‘ही’ अट

जेव्हा माध्यमांनी या विधानाबाबत त्यांना जाब विचारला, तेव्हा बरैया यांनी माफी मागण्याऐवजी त्याचा विचित्र बचाव केला. ते म्हणाले की, "हे माझे स्वतःचे संशोधन आहे. मी अनेक ग्रंथालयांत गेलो, अनेक ठिकाणी निरीक्षणे केली आणि तिथूनच मला हा सुगावा लागला." तसेच, ही विधाने व्हिडिओचा भाग नव्हती किंवा ती संदर्भाबाहेर मांडली गेली आहेत, असा दावाही त्यांनी केला. "मी महिलांच्या विरोधात नाही, तर त्यांच्या बाजूने उभा आहे," असे म्हणत त्यांनी आपल्या विधानातील अभद्रपणा फेटाळून लावला.

Congress MLA Controversial Statement
Madhya Pradesh Crime: दुसऱ्याशी केलं लग्न, 23 वर्षीय एक्स गर्लफ्रेंडवर 8 मित्रांसह प्रियकराचा सामूहिक बलात्कार

मध्य प्रदेश (Madhya Pradesh) भाजपचे मीडिया प्रभारी आशिष उषा अग्रवाल यांनी या मुद्द्यावरुन काँग्रेस हायकमांडला धारेवर धरले. त्यांनी 'X' वर पोस्ट करत म्हटले की, "इंदूरमध्ये राहुल गांधींसोबत मंचावर बसणारे फूलसिंग बरैया जेव्हा अशी विधाने करतात, तेव्हा ती केवळ त्यांची वैयक्तिक मते नसून संपूर्ण काँग्रेसची तीच विचारसरणी आहे, हे स्पष्ट होते. राहुल गांधींच्या नेतृत्वाखालील काँग्रेसची महिला आणि दलित-आदिवासी समुदायाप्रती असलेली ही विकृत आणि हताश मानसिकता उघड झाली आहे."

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com