springs water Dainik Gomantak
गोवा

मडगावमध्ये काँक्रीटचे जंगल; तरीही 'या' ठिकाणी आहेत शुद्ध पाण्याचे झरे

शहरीकरणाच्या रेट्यात शहरातील पाण्याच्या विहिरी कधीच्याच नाहीशा झाल्या आहेत. अशा या काँक्रिटीकरणाच्या जंगलातही येथील परिसरात शुद्ध पाण्याचे झरे अजूनही आपापले आतिस्तव टिकवून वाहत आहेत.

दैनिक गोमन्तक

फातोर्डा : मडगाव (Margao) शहराला काँक्रीट जंगलाचा विळखा पडत आहे. ठिकठिकाणी टोलेजंग इमारती उभ्या राहत आहेत. त्यामुळे पारंपरिक जलस्रोतांना धोका पोचला आहे. असे असले तरीही काही ठिकाणी शुद्ध पाण्याचे झरे अजूनही टिकून आहेत. झऱ्यांच्या या अस्तित्वामुळे मडगाववासीयांसाठी ही दिलासादायक बाब आहे. पण, या नैसर्गिक झऱ्यांचे जतन होणे आवश्यक आहे.

शहरीकरणाच्या रेट्यात शहरातील पाण्याच्या विहिरी कधीच्याच नाहीशा झाल्या आहेत. अशा या काँक्रिटीकरणाच्या जंगलातही (forest) येथील परिसरात शुद्ध पाण्याचे झरे अजूनही आपापले आतिस्तव टिकवून वाहत आहेत.

‘हेडन झरा’ हा आणखी एक झरा मोती डोंगरावरून उगम पावत आहे. या डोंगरावर दाट झोपडपट्टी आहे. मात्र तिथे हा झरा जपला आहे. येथील झऱ्याचे पाणी शुद्ध स्वरूपात वाहत आहे. असाच झरा ताळेबांद येथेही असून, याचेही पाणी शुद्ध आहे. या झऱ्यावर जलकुंड बांधण्यात आलेले असून ख्रिस्ती बांधवांच्या ‘सांजाव’ या सणाचे आयोजन होत असते, असे स्थानिक नगरसेवक दामोदर शिरोडकर यांनी सांगितले. हा झरा आंधळ्यांच्या झरा म्हणून परिचित असल्याचे ते म्हणाले.

मडगावातील आना फोंत झराही आपल्या औषधी गुणधर्मासाठी परिचित आहे. पूर्वी या झऱ्यावर लोक आंघोळ करायचे. मात्र, आता त्याचा गणपती विसर्जनासाठी उपयोग केला जात आहे. त्यामुळे भविष्यात हा झरा लुप्त होण्याची भीती आहे.

ताळसा’वर मिळते रोगमुक्ती....

बाबू नायक निवासस्थानापासून घोगळ हाऊसिंग बोर्डला जण्याच्या रस्त्याच्या डाव्या बाजूला असलेली ‘ताळसा’ झर ही औषधी गुणधर्मापैकी एक आहे. औषधी गुणधर्म असलेली झर म्हणून सुपरिचित असल्याने या झरीवर चर्म रोग्याने स्नान केल्यास तो रोगमुक्त होतो अशी या झरीची ख्याती असून, काहींना तसा अनुभवही आला आहे. अनेक चर्मरोगी येथे स्नान करण्यासाठी येतात आणि रोगमुक्त होऊन जातात, असे स्थानिकांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's Live News: फोंड्यात बाल विवाहाचा प्रकार उघडकीस

Goa Crime: टॅक्सीचालकाने केले अल्पवयीन मुलीशी लग्न; घरी गेल्यावर उलगडला खरा प्रकार, कर्नाटकातील तरुणाच्या आवळल्या मुसक्या

'ही धूळफेक ठरू नये...'; निवड आयोगाकडून भरतीच्या निर्णयावर चोडणकर, बोरकरांनी सुनावले खडे बोल

C K Nayudu Trophy: गोव्यावर फॉलोऑनची नामुष्की! अझान, देवनकुमारची शतकी सलामी

'सहकार क्षेत्रातील बँकांनी तयार रहावे..'; एनपीए वाढ, डबघाईवरुन मंंत्री शिरोडकरांनी दिला कडक इशारा

SCROLL FOR NEXT