मडगाव कब्रस्तानचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर, सुधारणा करण्याची मागणी

ओडीपीत दुरुस्ती करून सोनसोडो येथे कब्रस्तानासाठी संपादित केलेली जमीन फक्त दफनभूमीसाठीच वापरण्याची तरतूद करावी, अशी मागणी केली आहे..
cemetery
cemeteryDainik gomanatak

मडगाव : मडगावचा (Margao) बाह्यविकास आराखडा हरकती व सूचना नोंदविण्यासाठी पुन्हा खुला केल्याने दशकभरानंतर मडगाव व फातोर्डातील वाढत चाललेल्या मुस्लीम लोकसंख्येसाठी कब्रस्तानचा (Cemetery) मुद्दा पुन्हा उकरल्यासारखे झाले आहे. त्यातून 2022 मधील विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने नेते मंडळी त्याचे राजकारण (Politics) करताना दिसत आहेत.

वास्तविक गेली काही वर्षे या विषयावर पडदा पडला होता; पण एसजीपीडीएने बाह्यविकास आराखडा हरकती व सूचना नोंदविण्यासाठी खुला केल्याने पुन्हा तो ऐरणीवर आला आहे. सुन्नी जमातूल मुस्लमीन जामिया मस्जीद (Mosque) मालभाट यांनी ओडीपीत दुरुस्ती करून सोनसोडो येथे कब्रस्तानासाठी संपादित केलेली जमीन फक्त दफनभूमीसाठीच वापरण्याची तरतूद करावी, अशी मागणी केली आहे.

cemetery
मडगाव रवींद्र भवन संस्थेला अपेक्षित अनुदान मिळणार; सगुण वेळीप

तेवढेच नव्हे तर जामिया मस्जिदीने 2008 मधील ओडीपीत या कब्रस्तान जागेत सबस्टेशन व कमी खर्चाची घरे उभारण्याचा जो प्रस्ताव पुढे रेटला होता, त्याला हरकत घेतली आहे. ही जमीन एकूण 30,191 चौ.मी. क्षेत्रफळाची आहे. जामिया मशिदीने यापूर्वीच एसजीपीडीएला विरोध दर्शविला आहे तसेच यासंदर्भात मडगाव पालिकेचे दरवाजेही ठोठावले आहेत. ही जमीन पालिकेने कब्रस्तानासाठी संपादित केली होती.

मशिदीचे सरचिटणीस इम्रान खान यांनी अर्जात म्हटले आहे की, ही जमीन पालिकेने (Municipal Corporation) कब्रस्तानासाठी संपादित केली होती. तेथे सबस्टेशन वा कमी खर्चाची घरे उभारणे संपूर्णतः बेकायदेशीर आहे. म्हणून एसजीपीडीएला तेथे झोन बदल करता येत नाही. कारण त्यामुळे ज्या हेतूने ती संपादली, त्या हेतूलाच बगल दिल्यासारखे होणार आहे.

cemetery
मडगाव नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांचा कामावर बहिष्कार

ही जमीन ओडीपीत आर्चड म्हणून दाखविण्याच्या कृतीने आपणाला धक्का बसल्याचेही त्यांनी नमूद केले आहे. कोणत्या आधारावर एसजीपीडीएने हा बदल केला, असा सवाल त्यांनी केला आहे.

सत्ताधीशांनीच घडवला झोनबदल

ही जमीन सोनसोडो कचरा डंप यार्डसमोर व चर्च दफन भूमीला लागून आहे. त्या भागातील व बोर्डा येथील रहिवाशांनी कब्रस्तानला विरोध केला होता. नंतर सरकारी स्तरावर कब्रस्तान शिरवडेजवळ स्थलांतरित करण्याचे प्रयत्न झाले व त्या काळात सत्तेवर असलेल्यांनीच हा झोन बदल घडवून आणला, असा आरोप होत आहे. शिरवडे भागातील रहिवाशांनीही कब्रस्तानला विरोध केला व नंतर हा प्रस्ताव शीतपेटीत गेला. आता दहा वर्षांनी तो पुन्हा उफाळला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com