Water sports in Goa  Dainik Gomantak
गोवा

आता पावसाळ्यातही गोव्यात 'वॉटर स्पोर्ट्स', सावंत सरकारकडून हालचालींना वेग

गोवा सरकारने पावसाळ्यातही गोव्यात 'वॉटर स्पोर्ट्स' सुरु करण्याचा प्रस्ताव आणला आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Water sports in Goa

गोव्यात समुद्रकिनारे जेवढे प्रसिद्ध आहेत तेवढेच 'वॉटर स्पोर्ट्स' देखील प्रसिद्ध आहेत. देशी विदेशी पर्यटक गोव्यात जलक्रीडांचा आनंद घेत असतात. एवढेच नव्हे तर अनेक प्रसिद्ध व्यक्ती जलक्रीडांचा आनंद घेण्यासाठी गोव्यालाच पसंती देतात. मात्र, पावसाळ्यात राज्यातील जलक्रीडांवर बंदी असते.

दरम्यान, गोवा सरकारने पावसाळ्यातही गोव्यात 'वॉटर स्पोर्ट्स' सुरु करण्याचा प्रस्ताव आणला आहे. राज्यातील प्रमुख नद्यांमध्ये जलक्रीडा सुरु करण्याचा राज्य सरकारचा मानस आहे.

गोवा सरकारने साळ, शापोरा, झुआरी, दोना पावला खाडी, मांडवी, नेरुळ आणि सिक्केरी या नद्यांमध्ये पावसाळ्यात जलक्रीडांना परवानगी देण्याचा प्रस्ताव ठेवला आहे.

पावसाळ्यात योग्य हवामान असताना वर नमूद केलेल्या नद्यांमध्ये जलक्रीडांना परवानगी देण्याचा प्रस्ताव बंदर कप्तान खात्याने ठेवला आहे. असे अलिकडेच्या राजपत्रित अधिसूचनेत म्हटले आहे.

अधिसूचना प्रसिद्ध झाल्यापासून मुदत संपण्यापूर्वी (पाच दिवस) प्रस्तावाबाबत ज्यांना हरकती आणि सूचना गोवा सरकारच्या बंदर विभागाला पाठवू शकतात, असे अधिसूचनेत नमूद करण्यात आले आहे.

अधिसूचनेत वैध ऑपरेटर परवाना आणि विमा यासह जजलक्रीडांबाबत काही अटी व शर्ती नमूद केल्या आहेत.

"पावसाळ्यातील जलक्रीडा उपक्रम केवळ अंतर्देशीय पाण्यातच (inland water) असतील याची खबरदारी घ्यावी. जलक्रीडा उपक्रमांना फक्त सकाळी 9 ते संध्याकाळी 6 या वेळेत परवानगी असेल. कोणत्याही प्रतिकूल हवामानाच्या पार्श्वभूमीवर किंवा बंदर विभागाच्या कॅप्टन किंवा हवामान खात्याच्या कोणत्याही हवामान सूचनांच्या पार्श्वभूमीवर सर्व जलक्रीडा उपक्रम ताबडतोब बंद कराव्यात." असेही या अधिसूचनेत म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: 'ट्रेनच्या खिडकीतून बाहेर लटकणारे पाय अन्...'; चिमुकलीच्या व्हिडिओनं खळबळ; सोशल मीडियावर थरकाप व्हायरल

Sanjay Dutt Luxury Hotel In Goa: संजय दत्तचं गोव्यात आलिशान लक्झरी हॉटेल, उद्घाटनापूर्वीच रचला इतिहास; आंतरराष्ट्रीय स्तरावर ठरतंय चर्चेचा विषय

Vaidhriti Yoga: ऑफिसमध्ये वाद अन् प्रवासात नुकसान! सूर्य-चंद्राची अशुभ युती उडवणार झोप; वैधृती योग 'या' राशींसाठी ठरणार घातक

Delhi Student Protest: मुलांचा आक्रोश, अमानुष अत्याचार अन् रक्ताळलेलं 'आंदोलन'! शिक्षणातील लाल फितीविरुद्ध 'जेन-झी'चा आरपारचा रणसंग्राम

Anti Defection Law: सत्तेची चिता पेटवण्यासाठी निष्ठेचा बळी? राजकीय पक्षांतराच्या अनैतिक नाट्यावर ताशेरे; आमदार पळवणाऱ्या वृत्तीमुळे प्रादेशिक पक्षांचे अस्तित्व धोक्यात

SCROLL FOR NEXT