Hello Goenkar: प्रश्न तुमचे, उत्तरं मुख्यमंत्र्यांची; शुक्रवारी प्रमोद सांवत यांचा 'हॅलो गोंयकार' कार्यक्रम

प्रत्येक महिन्याच्या पहिल्या शुक्रवारी मुख्यमंत्री सावंत राज्यातील जनतेशी संवाद साधतात.
Hello Goenkar
Hello GoenkarDainik Gomantak
Published on
Updated on

Hello Goenkar: राज्यातील जनतेशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी हॅलो गोंयकार या कार्यक्रमाची सुरूवात केली आहे. प्रत्येक महिन्याच्या पहिल्या शुक्रवारी मुख्यमंत्री सावंत राज्यातील जनतेशी संवाद साधतात.

जूनमध्ये या कार्यक्रमाचा पहिला भाग पार पडला, त्यानंतर आता जुलै महिन्यातील कार्यक्रम येत्या शुक्रवारी (07) जुलै रोजी होत आहे. फोन इन कार्यक्रम असल्याने राज्यातील कोणताही व्यक्ती या कार्यक्रमात प्रश्न विचारू शकतो.

येत्या शुक्रवारी रात्री सात वाजता दुरदर्शन वाहिनीवरती हा कार्यक्रम लाईव्ह दाखवला जाणार आहे. राज्यातील सामान्य नागरिकांना या कार्यक्रमात फोनच्या माध्यमातून सहभागी होता येईल.

सामान्य जनतेला भेडसावत असलेल्या विविध समस्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून थेट मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवता येतात. मुख्यमंत्री तात्काळ त्याची दखल घेऊन योग्य ती माहिती आणि समस्येचे निराकरण करतात.

Hello Goenkar
Goa Congress: विधानसभा अधिवेशनपूर्वी काँग्रेस प्रभारी गोवा दौऱ्यावर, काय कानमंत्र देणार?

असे व्हा कार्यक्रमात सहभागी

दुरदर्शन गोवा चॅनलवरती शुक्रवारी सायंकाळी 07 ते 08 या वेळेत हा कार्यक्रम लाईव्ह पाहता येणार आहे. या कार्यक्रमात राज्यातील जनतेला देखील फोनच्या माध्यमातून सहभागी होता येणार आहे. यासाठी 0832 - 2222424 / 2225204 असे दोन नंबर जारी करण्यात आले आहेत. या नंबरवर फोन करत लोक कार्यक्रमात सहभागी होऊ शकतात.

'मन की बात'च्या धर्तीवर राज्यात स्वयंपूर्ण गोवाच्या अंतर्गत गोव्यातील जनतेशी संवाद साधणारा एक कार्यक्रम सुरु करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी फेब्रुवारीत केली होती. दरम्यान, 'हॅलो गोंयकार' या कार्यक्रमामुळे प्रत्येक महिन्याला राज्याचे मुख्यमंत्री आणि जनतेचा संवाद होणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com