Dabolim Water Shortage Dainik Gomantak
गोवा

Dabolim Water Shortage: दाबोळी मतदारसंघात 11 दिवसांपासून पाणी टंचाई; संतप्त नागरिकांकडून अधिकारी धारेवर

दैनिक गोमन्तक डिजिटल

Dabolim Water Shortage Issue: दाबोळी मतदारसंघात गेले 11 दिवस पाण्याची टंचाई भासत असून आज चिखली येथील रहिवाशांनी बायणा येथे सार्वजनिक बांधकाम पाणी विभाग कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी संतप्त नागरिकांना अधिकाऱ्यांना धारेवर धरले.

रहिवासी आणि पंच सदस्यांनी आपले गाऱ्हाणे अधिकाऱ्यांसमोर मांडले आणि या समस्येवर त्वरीत तोडगा काढण्याची मागणी केली.

वास्को शहरातील तीन वेगवेगळ्या मतदारसंघात येणाऱ्या अनेक भागांमध्ये गेल्या चार-पाच दिवसांमध्ये तीव्र पाणी टंचाई भासत आहे. रविवारी सकाळी दक्षिण गोव्यातील वीजपुरवठा बंद झाल्याने पाणीपुरवठा विस्कळीत झाला होता. तो आजतागायत सुरळीत झालेला नाही. त्यामुळे लोक हवालदिल झाले आहेत.

सडा, मांगोरहिल, वाडे, नवेवाडे, दाबोळी, चिखली या भागांना सर्वाधिक फटका बसला आहे. मंगळवारी पीडब्ल्यूडीने पाण्याचे टँकर पाठवले. यावेळी मांगोहिल भागातील रहिवाशी पाण्यासाठी तुटून पडले.

आजही वरील भागांत पाण्याची तीव्र टंचाई होती. सध्या पीडब्ल्यूडीकडे एकच टँकर असून तो किती ठिकाणी पुरणार अशी चर्चा आहे.

दाबोळी मतदारसंघात चिखली भागात गेले अकरा दिवस तीव्र पाणीटंचाई भासत आहे. त्यामुळे चिखली रहिवाशांनी आज बायणा येथे सार्वजनिक बांधकाम पाणी विभाग कार्यालयावर मोर्चा काढला.

या वेळी रहिवाशांसोबत काँग्रेसचे नेते कॅप्टन विरीयातो फर्नांडीस, माजी पंच सिकीत न्यूनेस, तसेच प्रभाग ११ चे पंच व इतर रहिवांशी उपस्थित होते.

मेगा प्रकल्पांना पाणी पुरवठा करत असल्याने सामान्य जनतेला पाण्यासाठी वणवण भटकावे लागते, असे फर्नांडीस म्हणाले.

पीडब्ल्यूडीचे सहाय्यक अभियंता नरेश पैगीणकर यांनी एक- दोन दिवसांत पाणीपुरवठ्याची समस्या सोडवली जाईल, असे सांगितले. वीज खंडित झाल्यामुळे अधिक समस्यांना सामोरे जावे लागते. जलाशयात पाण्याची पातळी कमी झाल्यास लोकांना कमी दाबाने पाणीपुरवठा होतो.

आमच्याकडे पीडब्ल्यूडीचे टँकर आहेत. खाजगी कंपन्यांकडून अधिकचे टँकर घेतले आणि स्टँडबाय जलाशयांमधून टँकरद्वारे पुरवठा सुरू केला आहे, असे त्यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

Fact Check: गोव्यात बोट पलटी होऊन 23 लोकांचा मृत्यू, 64 बेपत्ता; व्हायरल व्हिडिओ मागील सत्य काय?

SCROLL FOR NEXT