Goa-Patna Flight: गोवा-पाटणा थेट विमानसेवा सुरू; जाणून घ्या तिकीटाचे दर, वेळापत्रक...

आठवड्यातून 4 दिवस उड्डाणे
Goa-Patna Flight
Goa-Patna FlightDainik Gomantak

Patna-Goa Flight: गोव्यात मोपा येथे नवीन मनोहर इंटरनॅशनल विमानतळ कार्यान्वित झाल्यापासून देशभरातील विविध ठिकाणांवरून गोव्याला जोडणाऱ्या थेट विमानसेवा सुरू झाल्या आहेत.

नुकत्याच गोव्यातून देहरादून, बडोदा, भोपाळ येथे थेट विमानसेवेस सुरवात झाली आहे. या शहरांसह आता बिहारची राजधानी पाटणा येथूनही गोव्याला थेट विमानसेवेस प्रारंभ झाला आहे.

Goa-Patna Flight
Babush Monserrate: कन्सल्टंटला 8 कोटी रूपये दिले; स्मार्ट सिटीच्या कामाच्या दर्जाची जबाबदारी त्यांचीच

इंडिगो एअरलाईन्सने ही विमानसेवा सुरू केली आहे. आठवड्यातून चार दिवस ही विमानसेवा असणार आहे. रविवार, सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी पाटणा ते गोवा आणि परत गोवा ते पाटणा अशी ही उड्डाणे होतील.

फ्लाईट 6 ई 6931 चे गोव्याहून पाटण्यासाठी पहिले उड्डाण मंगळवारी 23 मे रोजी दुपारी 2 वाजून 10 मिनिटांनी झाले. 4 वाजून 27 मिनिटांनी ही फ्लाईट पाटणा विमानतळावर उतरली.

Goa-Patna Flight
Delhi-Mumbai Express Way: दिल्ली-गोवा प्रवासाचा वेळ आता 15 तासांनी घटणार; वाचा सविस्तर...

तर पाटण्याहून हीच फ्लाईट 6 ई 6932 या क्रमांकासह गोव्याकडे 135 प्रवाशांना घेऊन 5 वाजून 9 मिनिटांनी रवाना झाली.

यानंतर बुधवारी 9 वाजून 35 मिनिटांनी मोपा विमानतळावरून फ्लाईट असेल ती पाटण्यात 12 वाजून 20 मिनिटांनी उतरेल. तर परत येताना 16.30 वाजता उड्डाण करेल.

या विमानसेवेचे तिकीट 7500 रूपये ते 13 हजार रूपये इतके आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com