Bhuipal Water issue Dainik gomantak
गोवा

भुईपाल गावात पाण्यासाठी वणवण, नागरिक त्रस्त

टॅक्करच्या पाण्यावर तान भागवण्याची वेळ

दैनिक गोमन्तक

पिसुर्ले : होंडा पंचायत (Panchayat) क्षेत्रातील भुईपाल गावात गेल्या कित्येक दिवसांपासून सुरळीत पाणीपुरवठा होत नसल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे, या गावात इतर कोणतेही पाण्याची व्यवस्था नसल्याने नागरिकांना पुर्ण पणे नळाच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागत आहे.

गावातील नागरिकांना दाबोस येथिल पाणी (Water) पुरवठा प्रकल्पातून पाणी पुरविले जाते, त्यासाठी भुईपाल (Bhuipal) येथे भले मोठे जलकुंभ उभारण्यात आले आहेत, त्याठिकाणी पाणी साठवून विविध भागात वितरण केले जाते.

परंतू जलकुंभातून सोडण्यात येणाऱ्या पाण्याची जलवाहिनी गेल्या कित्येक दिवसांपासून नादुरुस्त होत असल्याने पाणी पुरवठा सुरळीत होत नाही. जलवाहिनीची दुरूस्ती एका खासगी कंत्राटदारामार्फत होत असल्याने ते काम हलक्या दर्जाचे होत आहे, त्यामुळे जलवाहिनी वारंवार फुटत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून या भागांत पाणी पुरवठा झाला नसल्याने नागरिकांची प्रचंड गैरसोय झाली असून, निवडणूक जवळ आली असल्याने पाणी पुरवठा सुरळीत होत नाही की काय असा प्रश्न नागरिक (citizens) उपस्थित करीत आहेत. सद्या पाणी पुरवठा खात्याच्या वतीने टॅक्कर पाठवून पाणी पुरवठा करण्याचे प्रयत्न होताना दिसत असले तरी मुबलक प्रमाणात पाणी मिळत नसल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: चिकन-मटन विसरा, इथे मिळतात चक्क 'कोब्रा सापाचे भजी अन् समोसे', खवय्यांची होते मोठी गर्दी; व्हिडिओ पाहून चक्रावले नेटकरी

Death Penalty News: लाखो निष्पापांच्या रक्ताने माखलेले हात, 24 वर्षांच्या जुलमी राजवटीचा भयानक अंत; 'या' देशाच्या माजी राष्ट्राध्याक्षासह भावाला फाशीची शिक्षा

Abhishek Porel Arrested: लव्ह, सेक्स अन् ब्लॅकमेलिंग! 23 वर्षीय स्टार आयपीएल खेळाडूला बलात्कार प्रकरणात अटक; उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मोठी कारवाई

Benjamin Netanyahu: "मी पंतप्रधान असेपर्यंत पॅलेस्टिनी राष्ट्र होणार नाही!", नेतन्याहूंचा डोनाल्ड ट्रम्पला मोठा झटका; धुडकावली 15 कलमी योजना

Chaturgrahi Yog 2026: नोकरीत प्रमोशन अन् नव्या जबाबदाऱ्या! चतुर्ग्रही योग 'या' 4 राशींसाठी ठरणार वरदान; व्यवसायात होणार कोट्यवधींचा नफा

SCROLL FOR NEXT