Water problem Dainik Gomantak
गोवा

पेडणे क्षेत्रात पाण्‍याची समस्‍या दिवसेंदिवस उग्र होत चालली

डोळ्‍यांत पाणी: पेडण्यात महिलांची वणवण

दैनिक गोमन्तक

मोरजी: पेडणे नगरपालिका क्षेत्रात पाण्‍याची समस्‍या दिवसेंदिवस उग्र होत चालली आहे. ‘कोणी पाणी देता का पाणी’ असे म्‍हणत वणवण भटकण्‍याची वेळ लोकांवर विशेषत: महिलांवर आलेली आहे. काही महिलांनी डोळ्‍यांत पाणी आणून सांगितले की, डिसेंबर महिन्यापासून नळांना पाणीच आलेले नाही. सकाळी उठल्‍यापासून पाण्‍याचा शोध घेणे हाच आता आमचा नित्‍यक्रम झालेला आहे. भिरोणे, सरमळे, मयेकरवाडा या भागातील ही स्‍थिती आहे.

एका बाजूने पेडणे तालुक्यात सरकार आंतरराष्ट्रीय दर्जाचे मोपा विमानतळ, कॅसिनो, आयुष हॉस्पिटल, क्रिकेट स्टेडियम व इतर प्रकल्प आणू पाहत आहेत. त्‍यातील बहुतांश प्रकल्‍पांचे काम पूर्णही होत आलेले आहे. या प्रकल्पांसाठी पाण्याची वेगळी व्यवस्था अजून करण्‍यात आलेली नाही. दुसऱ्या बाजूने चांदेल जलप्रकल्पातून येणारे पाणी सर्व पेडणेवासीयांना मिळतेच असे नाही. कधी पाणी येईल याचा नेम नसतो. जागरण करूनही नळांना पाण्याचा थेंब येत नाही. पाणी मिळत नसल्याने महिलांच्‍या डोळ्‍यांत अक्षरश: पाणी येत आहेत. आम्ही कुणाकडे दाद मागावी? टँकर आला तरी उंचीवर असलेल्या घरापर्यंत पाणी कसे नेणार? असे सवाल त्‍यांनी उपस्‍थित केले आहेत.

पेडणे पालिका क्षेत्रातील पाण्याच्या समस्येकडे आजपर्यंत कुणीच गांभीर्याने लक्ष दिलेले नाही. आता नवीन आमदार निवडून आल्‍यावर तरी दिलासा मिळेल, या आशेवर लोक आहेत

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Vs Oman: 126 धावांनी ओमानचा धुव्वा! गोव्याने परदेशात रचला मालिका विजयाचा इतिहास

Colvale Jail: ड्रग्ज, दरोड्यांचे कट अन् कारागृहातील मृत्यू; कोलवाळच्या भिंतीआड दडलंय काय? धक्कादायक वास्तवानं खळबळ

Goa Congress: वरवरची मलमपट्टी नको, मुळावर उपचार हवा! खर्गे आले, एकीचा संदेश दिला; पण काँग्रेसची अंतर्गत गटबाजी संपणार कधी?

Goa Politics: 'भाजपला हरवण्याआधी काँग्रेसने स्वतः एकवटावे', खर्गेंच्या आवाहनावर सरदेसाईंचा पलटवार; पक्षांतराची भीती

Goa Assembly Election 2027:'एकत्र लढू, एकत्र जिंकू'; गोवा विधानसभा निवडणुकीआधी खर्गेंचा काँग्रेस नेत्यांना विजयमंत्र

SCROLL FOR NEXT