Satari Rainfall  Dainik Gomantak
गोवा

Sattari Rainfall: जोरदार पावसामुळे होंडा - सत्तरीत रस्त्यांवर पाणी

Sattari Rainfall: वाहन चालकांची जोरदार पावसामुळे तारांबळ

गोमन्तक डिजिटल टीम

Sattari Rainfall: सत्तरी तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून पावसाने बरीच दडी मारली होती. आज बुधवारी मात्र सकाळच्या सत्रात सत्तरीत विविध ठिकाणी जोरदार पावसाने हजेरी लावली.

सकाळी होंडा भागात जोरदार पाऊस कोसळला. त्यामुळे दुचाकी वाहन चालकांची तारांबळ उडाली होती. जोरदार पावसामुळे चारचाकी वाहनांना देखील समोरील रस्ता व्यवस्थित दिसत नव्हता. परिणामी वाहनांच्या पार्किंग लाईट सुरू ठेवून वाहन चालविण्याची पाळी आली.

होंडा मुख्य रस्त्यावर जोरदार पावसामुळे प्रचंड प्रमाणात पाणी आले होते. काही ठिकाणी गटारे आहेत. त्यातून पावसाचे पाणी निचरा होत होते. परंतु काही ठिकाणी रस्त्याच्या एका बाजूला पाणी रस्त्यावर साचण्याचे प्रकार घडत आहेत.

अशा रस्त्याच्या बाजूंनी पावसाचे पाणी निचरा होण्यासाठी व्यवस्था करणे आवश्यक आहे. दुपार नंतर पावसाचा जोर ओसरला होता. सायंकाळी ऊन पावसाचा खेळ सुरू होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

आरटीआयचा ऐतिहासिक विजय! 33 वर्षांनंतर कांदोळी ग्रामपंचायतीने हुडकून काढल्या 'त्या' नोंदी

Goa Politics: शंभर कोटींचा 'तो' आरोप काँग्रेसवरच उलटणार? गिरीश चोडणकरांच्या वक्तव्याने गोव्याच्या राजकारणात खळबळ!

Viral Video: ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या तरुणीसोबत घाणेरडा प्रकार; खाली उभ्या असणाऱ्या तरुणाने केले अश्लील कृत्य, व्हिडिओ व्हायरल!

Goa Government Schools: शाळा वाढल्या पण बाकडी रिकामी! 6 वर्षांत 49 सरकारी शाळा बंद, तर विनाअनुदानित शाळांमध्ये ८ ने वाढ!

डोंगर माफियांची खैर नाही! डोंगरकापणीवरून कुठ्ठाळीतील राजकारण तापले; चौकशीच्या फेऱ्यात अडकणार दोषी

SCROLL FOR NEXT