IMD Rainfall Alert: येत्या 24 तासांत 'या' राज्यांमध्ये पडणार मुसळधार पाऊस, हवामान खात्याने दिली महत्त्वाची अपडेट!

IMD Rainfall Alert: हवामान विभागाने येत्या 24 तासांत उप-हिमालयीन पश्चिम बंगाल, आसाम, मेघालय आणि सिक्कीममध्ये मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.
IMD Rainfall Alert
IMD Rainfall AlertDainik Gomantak
Published on
Updated on

IMD Rainfall Alert: हवामान विभागाने येत्या 24 तासांत उप-हिमालयीन पश्चिम बंगाल, आसाम, मेघालय आणि सिक्कीममध्ये मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. त्यानंतर या राज्यांमध्ये घट होईल.

याशिवाय, येत्या दोन दिवसांत जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पश्चिम उत्तर प्रदेश, पश्चिम मध्य प्रदेश, गुजरात, पूर्व उत्तर प्रदेश, महाराष्ट्रातील अनेक भागांतून मान्सूनच्या प्रस्थानासाठी अनुकूल परिस्थिती राहील.

पूर्व भारताबद्दल सांगायचे झाल्यास, हिमालयीन पश्चिम बंगाल, सिक्कीममध्ये 5 आणि 6 ऑक्टोबर, झारखंड, बिहार, 5 ऑक्टोबर रोजी पश्चिम बंगाल, 5 ते 9 ऑक्टोबर रोजी अंदमान आणि निकोबार बेटांवर मुसळधार पाऊस पडणार आहे.

ईशान्य भारताबद्दल बोलायचे झाल्यास, आसाम, मेघालयात 5 ते 7 ऑक्टोबर, अरुणाचल प्रदेश, नागालँड (Nagaland), मणिपूरमध्ये 5 आणि 6 ऑक्टोबरला मुसळधार पाऊस पडेल. त्याचवेळी, वायव्येकडील काही राज्यांमध्ये पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

IMD Rainfall Alert
IMD Rainfall Alert: आली आनंदाची बातमी! येत्या 5 दिवसांत बरसणार मुसळधार सरी, हवामान खात्याने दिली मोठी अपडेट!

दुसरीकडे, जम्मू-काश्मीर, लडाख, हिमाचल प्रदेश, उत्तराखंडमध्ये (Uttarakhand) 9 ऑक्टोबर रोजी हलका ते मध्यम पाऊस पडणार असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे.

याशिवाय, काही भागात विजांचा कडकडाट आणि वादळाचा इशाराही देण्यात आला आहे. पश्चिम आणि दक्षिण भारताबद्दल बोलायचे झाल्यास, येथील हवामानात कोणताही मोठा बदल होणार नाही.

IMD Rainfall Alert
IMD Rainfall Alert: खूशखबर! ऐन उन्हाळ्यात 'या' राज्यांमध्ये बरसणार सरी, हवामान खात्याने दिली अपडेट

सिक्कीममध्ये आलेल्या पुरामुळे 14 जणांचा मृत्यू झाला आहे

उत्तर सिक्कीममधील ढगफुटीमुळे तिस्ता नदीला अचानक पूर आल्याने 14 जणांचा मृत्यू झाला आणि 23 लष्करी जवानांसह 102 लोक बेपत्ता झाले. गुरुवारी अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली.

सिक्कीम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने (एसएसडीएमए) आपल्या बुलेटिनमध्ये सांगितले की, बुधवारी आलेल्या आपत्तीपासून आतापर्यंत 2,011 लोकांना वाचवण्यात यश आले आहे, तर 22,034 लोक बाधित झाले आहेत. राज्य सरकारने आपत्तीग्रस्त चार जिल्ह्यांमध्ये 26 मदत शिबिरे उभारल्याची माहिती देण्यात आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com