Salaulim Dam Goa Dainik Gomantak
गोवा

वाढत्या उष्णतेमुळे गोव्यातील धरणातील पाणीपातळी 60 टक्क्यांवर

काणकोणात स्थिती समाधानकारक; पण हणजुणात पाण्याचा साठा 38 टक्क्यांपर्यंत खाली

सुशांत कुंकळयेकर

मडगाव : उन्हाळा संपण्यासाठी अजून एक महिना बाकी असला तरी राज्यातील वाढलेल्या तापमानाचा परिणाम पाण्याच्या साठ्यावर दिसून येऊ लागला आहे. कडक उन्हामुळे राज्यातील प्रमुख धरणातील पाणी आटून त्याचे प्रमाण आता 55 ते 60 टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे.

संपूर्ण दक्षिण गोव्याला (South Goa) पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या साळावली जलाशयात सध्या 55 टक्के पाणी बाकी आहे. काणकोण तालुक्यातील गावणे जलाशयात 57 टक्के तर चापोली धरणात 63 टक्के पाणी आहे. मात्र उत्तर गोव्यात हणजुण जलाशयातील पाण्याची पातळी 38 टक्के एवढी खाली आली आहे. तर दक्षिण गोव्यातील पंचवाडी धरणातील पाण्याचा साठा 35 टक्क्यांवर आला आहे. गोव्यातील सध्याचे हे सर्वात कमी पाणी असलेले जलाशय ठरले आहेत.

सध्या वाढलेल्या उष्णतेमुळे पाण्याचे बाष्पीभवन होऊन पाणी कमी होत असले तरी आहे ते पाणी पावसाळा सुरु होईपर्यंत वापरण्यास पुरेसे असल्याने चिंता करण्याची सध्या फारशी गरज नाही असे मत पाणी खात्याच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केले आहे. राज्यातील जलाशयाच्या पातळीवर पाट बंधारे खाते बारीक लक्ष ठेऊन आहे. गोव्यातील जल व्यवस्थापनासाठी मोठ्या धरणाबरोबर अन्य 337 बंधाऱ्यांचा उपयोग केला जात आहे.

उत्तर गोव्याला (North Goa) पाणीपुरवठा करणाऱ्या तिळारी धरणातील पाण्याचा साठा समाधानकारक असून यातील पाण्याचे चांगल्या तरेने वितरण व्हावे यासाठी या धरणाला जोडलेल्या कालव्यांचीही दुरुस्ती करण्यात आल्याची माहिती पाटबंधारे खात्याकडून मिळाली.

बार्देश तालुका आणि डिचोलीच्या काही भागांना पाणीपुरवठा करणाऱ्या आमठाणे धरणाच्या पाण्याची पातळी राज्यात सर्वात जास्त म्हणजे 68 टक्के एवढी आहे. फोंडा (Ponda) आणि तिसवादी तालुक्याला पाणी पुरवठा करणाऱ्या ओपा जलाशयाची पातळी जरी कमी होत असली तरी या जलाशयात साळावली व गांजे नदीतील पाणी पंपद्वारे उपसून सोडले जात असून त्यामुळे या धरणातील पाणी व्यवस्थित आहे अशी माहिती संबंधितांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sporting Club Goa: दीपांकुर शर्मा यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी; आय-लीग 2 मध्ये दमदार कामगिरीचे लक्ष्य

Goa Research: त्वचेच्या उपचारात 3D तंत्रज्ञानाची नवी झेप! स्वस्त आणि सुरक्षित जलजेल विकसित

Colvale Central Jail: कोलवाळ कारागृहात वाईननिर्मितीचा आरोप; प्रशासनाचा स्पष्ट इन्कार, 'सुरक्षा कडक केल्याने नाराजांचे षड्‌यंत्र'

Illegal Hill Cutting Case: 4 वर्षांच्या लढ्याला अखेर यश! हडफडेची बेकायदा कापलेली टेकडी पूर्ववत; हायकोर्टानं प्रकरण काढलं निकाली

Toxic Movie Release: 'टॉक्सिक'चा धमाका! रॉकस्टार यशची रुपेरी पडद्यावर धमाकेदार एन्ट्री; थिएटर्सबाहेर चाहत्यांची तोबा गर्दी VIDEO

SCROLL FOR NEXT