Bicholim Market Dainik Gomantak
गोवा

Bicholim Market: डिचोली बाजार संकुल प्रकल्पात पाणी गळतीची समस्या; आम्ही धंदा कसा करायचा?

विक्रेत्यांचा प्रश्न ; फळभाजी आदी विक्रेत्यांसह दुकानदारांची धांदल उडते.

गोमन्तक डिजिटल टीम

डिचोलीतील बाजार संकुलात सध्या पावसाची गळती होत असल्याने विक्रेते आणि दुकानदारांसमोर मोठी समस्या निर्माण झाली आहे. या समस्येबाबतीत कळवूनही त्याकडे कोणीच लक्ष देत नाहीत. असे विक्रेत्यांनी सांगून, आम्ही धंदा कसा करायचा? असा प्रश्न उपस्थित केला आहे. डिचोली पालिकेच्या तिसऱ्या टप्प्यातील बाजार संकुलात पावसाच्या गळतीची ही समस्या आहे.

या संकुलाच्या छपरातून सर्वत्र गळती लागत आहे. जोरदार पावसावेळी या संकुलात तर गंभीर समस्या निर्माण होत आहे. विक्रेत्यांसह ग्राहकांनाही या समस्येला तोंड द्यावे लागते. गळतीच्या या समस्येमुळे ग्राहक सोडाच काही विक्रेत्यांनीही सध्या तरी संकुलाकडे पाठ केली आहे. या समस्येची पालिकेने तातडीने दखल घ्यावी. अशी मागणी बाजार संकुलातील फळ-भाजी विक्रेत्यांसह अन्य दुकानदारांनी केली आहे.

भांड्यांचा वापर

पावसाची गळती सुरू झाली, की पाण्यापासून बचाव करण्यासाठी विक्रेत्यांवर बादल्या आदी भांडी ठेवण्याची पाळी येते. बहुतेक विक्रेत्यांनी गळती लागते, त्याठिकाणी ही भांडी ठेवूनच दिली आहेत. पावसाच्या पाण्यात भिजून कांदे आदी भाजी तसेच फळे खराब होत असून, आम्हाला नुकसानीचा फटका बसत आहे. असे फिरोज खान, सुमन पाटील आणि अन्य विक्रेत्यांनी सांगितले.

संकुलात जलधारा

गेल्यावर्षीही या बाजार संकुलात गळतीची समस्या होती. यंदा मात्र ही समस्या मोठी आणि गंभीर झाली आहे. पावसावेळी संकुलाच्या छपरातून पाण्याची गळती लागते. जोरदार पाऊस पडला, की संकुलात सर्वत्र जलधारा सुरू होतात आणि मग फळभाजी आदी विक्रेत्यांसह दुकानदारांची धांदल उडते. या समस्येमुळे विक्रेत्यांसह ग्राहकांनाही मोठा मनस्ताप सहन करावा लागतो. संकुलात साचणाऱ्या पाण्यामुळे विक्रेते आणि ग्राहकांना ''घसरगुंडी''चाही अनुभव येत आहे. असे विक्रेते आणि दुकानदारांचे म्हणणे आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT