Water Leakage in Benaulim Dainik Gomantak
गोवा

गोव्यात पाणीप्रश्न पेटलेलाच, बाणावलीत मात्र पाण्याची नासाडी

डिसेंबरपासून गेले चार महिने पाईपलाईन लीक असल्याने हजारो लीटर पाणी जातंय वाया

दैनिक गोमन्तक

पणजी : गोव्यात सध्या पाण्याचा प्रश्न पेटलेला असतानाच दक्षिण गोव्यातील बाणावलीत हजारो लीटर पाण्याची नासाडी होत असल्याचं उघड झालं आहे. मेरशीपासून वास्कोपर्यंत पाण्याच्या टंचाईमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. मात्र डिसेंबरपासून गेले चार महिने सुरु असलेल्या पाणीगळतीकडे प्रशासनाचं दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण आहे.

दक्षिण गोव्यातील बाणावलीमध्ये (Benaulim) डिसेंबर 2021 पासून पाण्याची गळती सुरु असल्याचं स्पष्ट झालं आहे. एकीकडे पाणीटंचाईचा मुद्दा गोव्यात तापलेला असतानाच दुसरीकडे चार महिन्यांपासून हजारो लीटर पाण्याची नासाडी झाल्याचं चित्र आहे. पाण्याच्या पाईपलाईनला लागलेल्या गळतीमुळे पाणी वाया जात आहे. रस्त्याच्या शेजारी पाण्याची नासाडी पाहूनही पाणीपुरवठा विभागाकडून दुर्लक्ष होत असलेलं पाहून नागरिक संतप्त झाले आहेत.

बाणावलीतील मारिया हॉलशेजारीच पाईपलाईनला गळती लागल्याने पाणी वाहून जात आहे. गेल्या तीन महिन्यांपासून याची तक्रार करुनही आजपर्यंत पाणीपुरवठा (Water Supply) विभागाचा एकही अधिकारी याची पाहणी करण्यास आला नसल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याकडे डिसेंबरमध्येच तक्रार दाखल केली होती, मात्र आजपर्यंत कोणताही ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही, असं स्थानिकांचं म्हणणं आहे. राज्यात अनेक ठिकाणी अनियमित पाणीपुरवठा होत असल्याने बाणावलीतील पाण्यामुळे वातावरण तापण्याची चिन्हं आहेत.

राजधानी पणजीतील (Panjim) मेरशी, चिंबल, सांताक्रुझ, ताळगाव भागात पाणीटंचाईचा प्रश्न मोठ्या प्रमाणात भेडसावताना दिसत आहे. यातच नवीन सार्वजनिक बांधकाम मंत्री नीलेश काब्राल यांनी गोव्यात 24 तास पाणीपुरवठा शक्य नसल्याचं म्हटलं आहे. यातच बाणावलीत अधिकाऱ्यांकडून उडवाउडवीची उत्तरं दिली जात असून पाईपलाईनची दुरुस्ती करण्याची तसदीही अधिकाऱ्यांनी घेतलेली दिसत नाही. तसंच रात्रीच्या वेळी जेव्हा पाण्याचा दाब जास्त असतो त्यावेळी जास्त पाण्याची नासाडी होते असा आरोप स्थानिकांनी केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lessons from Animals: प्राण्यांकडूनही शिकता येतात जीवनाचे धडे! मुंग्यांची शिस्त, पक्ष्यांची मेहनत अन् निसर्गाची जादू

Bangladesh Resort Fire: बांगलादेशात रिसॉर्टला भीषण आग, 10 जणांचा होरपळून मृत्यू; जीव वाचवण्याची संधीच मिळाली नाही VIDEO

Trigrahi Yog 2026: ग्रहांच्या फेरबदलाचा मोठा चमत्कार! त्रिग्रही आणि बुधादित्य योगाच्या संयोगाने उजळणार 3 राशींचे भाग्य; होणार अफाट धनलाभ

INS Samarthak Warship: भारताची पहिली बहुउद्देशीय युद्धनौका 'समर्थक' नौदलात दाखल; सागरी सुरक्षा होणार अधिक मजबूत!

Hero च्या दोन नव्या बाइक्स लॉन्च! किंमत 1.27 लाखांपासून सुरू, क्रूझ कंट्रोलसह मिळणार अनेक भन्नाट फीचर्स

SCROLL FOR NEXT