Senior environmentalist Nirmala Sawant in goa Dainik Gomantak
गोवा

Goa Environment: जल, जमीन, जंगल वाचलेच पाहिजे; ज्येष्ठ पर्यावरणप्रेमी निर्मला सावंत

Goa Environment: निर्मला सावंत : ‘ग्रीन गोवा’च्या छताखाली एकवटले आंदोलक

दैनिक गोमन्तक

Goa Environment: गोव्‍याच्‍या भावी पिढीसाठी जल, जमीन आणि जंगल वाचले पाहिजे तरच गोवा वाचेल. राज्य आणि केंद्र सरकारच्या विविध धोरणांमुळे पाण्‍याचा, जमिनींचा मोठ्या प्रमाणात ऱ्हास होत आहे. त्‍यामुळेच राज्यातील सर्व आंदोलक ‘ग्रीन गोवा’ या एका छताखाली येत आहेत.

लवकरच आंदोलनाची दिशा जाहीर केली जाईल, अशी माहिती ज्येष्ठ पर्यावरणप्रेमी तथा आंदोलक निर्मला सावंत यांनी आज दिली.

राज्यातील विविध संघटना आणि सिव्‍हिल सोसायटी यांच्या वतीने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत सावंत बोलत होत्या. यावेळी प्रा. प्रज्वल साखरदांडे, तनोज अडवलपालकर, प्रतिमा कुतिन्हो, एलिना साल्‍ढाणा व अन्य सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.

सावंत म्हणाल्या, सरकारच्या वतीने कृषी धोरण बनविण्याचे काम सुरू आहे. यासाठी सामाजिक कार्यकर्ते म्हणून आम्ही काही हरकती आणि सूचना केल्या आहेत. त्यांचा या धोरणात अंतर्भाव व्हावा अशी अपेक्षा आहे. सरकारने शेतकऱ्यांच्या हिताचे कृषी धोरण बनवावे.

रानटी जनावरांमुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. याकडे सरकारच्या वनखात्याने लक्ष देणे गरजेचे आहे. जंगलांमध्येच या जनावरांना योग्य खाद्य मिळेल यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. त्‍यासाठी पश्चिम घाटात पेडणे ते काणकोणपर्यंत एक सरळ ‘जंगल पॅच’ तयार केला पाहिजे.
- निर्मला सावंत, पर्यावरणप्रेमी
सरकारच्या विविध धोरणांमुळे राज्यातील शेतजमीन, जंगल धोक्यात आले आहे. म्हणूनच आम्ही २ ते ३१ ऑक्टोबर या काळात ‘गांधी से पटेल तक, शांती से एकता तक’ हे अभियान राबवतोय. ३१ रोजी मडगावात सरकारच्या चुकीच्या धोरणाविरोधात आंदोलन करणार आहोत.
- प्रतिमा कुतिन्‍हो, सामाजिक कार्यकर्त्या
जल, जंगल आणि शेती वाचविण्‍याऐवजी ती कशी संपेल यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. ठिकठिकाणी डोंगरकापणी सुरू आहे. मोठमोठी हॉटेल्स बनविली जात आहेत. स्थानिकांना नको असलेले प्रकल्प राबवले जात आहेत. हा गोमंतकीयांवर अन्याय आहे.
- प्रा. प्रजल साखरदांडे, पर्यावरणप्रेमी

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Illegal Hill Cutting Case: 4 वर्षांच्या लढ्याला अखेर यश! हडफडेची बेकायदा कापलेली टेकडी पूर्ववत; हायकोर्टानं प्रकरण काढलं निकाली

Toxic Movie Release: 'टॉक्सिक'चा धमाका! रॉकस्टार यशची रुपेरी पडद्यावर धमाकेदार एन्ट्री; थिएटर्सबाहेर चाहत्यांची तोबा गर्दी VIDEO

Goa Weather Update: वाळपईत पावसाचे ‘शतक’! 2,552 मिमी पावसाची नोंद, मात्र किनारपट्टी भाग अजूनही कोरडाच

Viral Video: तेलाच्या टँकमध्ये पठ्ठ्यानं मारली डुबकी, तरुणाचा कारनामा पाहून लोकांचा चढला पारा; म्हणाले, ''भावा, जरा तरी लाज बाळग!"

Porvorim Development: पर्वरीचा विकास वेगाने; परंपरा आणि आधुनिकतेचा सुंदर संगम! फ्लायओव्हरपासून शेती, आरोग्य आणि क्रीडा सुविधांपर्यंत बदलांचा वेध

SCROLL FOR NEXT