Vitthal Wari news Dainik Gomantak
गोवा

Pandharpur Wari: यंदाही 'माउली श्वान' ठरतंय वारीचं आकर्षण; 120 वारकऱ्यांसह विठ्ठल दर्शनाच्या वाटेवर

Mauli dog Wari: यंदा या वारीत १२० वारकरी सहभागी झाले आहेत, ज्यात गेल्या वर्षीप्रमाणेच 'माऊली' नावाचा एक श्वानही सामील असल्याने वारीचे आकर्षण वाढले

Akshata Chhatre

वास्को: विठ्ठलनामाचा गजर करत, मुरगाव वारकरी संस्थेच्या पंढरपूर पायी वारीचा शनिवार (दि. २२) मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला. मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर यांनी वारीला शुभेच्छा दिल्यानंतर, सडा येथील ब्राह्मणेश्वर मंदिरात पूजाअर्चा करून ही वारी पंढरीच्या दिशेने मार्गस्थ झाली. यंदा या वारीत १२० वारकरी सहभागी झाले आहेत, ज्यात गेल्या वर्षीप्रमाणेच 'माऊली' नावाचा एक श्वानही सामील असल्याने वारीचे आकर्षण वाढले आहे.

'माऊली' श्वानाचे यंदाही वारीतील विशेष स्थान

गेल्या वर्षीपासून सडा येथून मुरगाव वारकरी संस्थेची ही पायी वारी निघत आहे. गतवर्षी ५६ वारकरी यात सहभागी झाले होते, तेव्हापासूनच एक श्वानही या वारीमध्ये सामील झाले होते आणि त्याने संपूर्ण वारी पूर्ण करून सर्वांचे लक्ष वेधले होते. यंदाही तेच 'माऊली' श्वान वारीचे एक विशेष आकर्षण ठरले आहे, जे वारकऱ्यांसोबत विठ्ठल भेटीसाठी निघाले आहे.

आमदार आमोणकरांकडून शुभेच्छा

आमदार संकल्प आमोणकर आणि नगरसेविका श्रद्धा आमोणकर यांनी वारीतील सर्व १२० वारकऱ्यांना शुभेच्छा दिल्या. सडा येथील ब्राह्मणेश्वर मंदिरात पारंपरिक पूजाविधी झाल्यावर वारीला सुरुवात झाली.

आमदार आमोणकर आणि नगरसेविका श्रद्धा आमोणकर यांनीही काही अंतरापर्यंत वारकऱ्यांसोबत पायी चालत, त्यांच्या उत्साहात सहभाग नोंदवला.

चौदा दिवसांचा प्रवास, पंढरपूरकडे वाटचाल

या पायी वारीला शनिवारपासून सुरुवात झाली असून, चौदा दिवसांनंतर ही वारी पंढरपुरात पोहोचेल अशी अपेक्षा आहे. विठ्ठल-रुक्मिणीच्या भेटीसाठी वारकऱ्यांमध्ये असलेला उत्साह आणि 'माऊली' श्वानाची उपस्थिती यामुळे ही वारी यंदाही चर्चेचा विषय ठरली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

गोव्याच्या दारूवर महाराष्ट्राचे लेबल; तेलाच्या नावाखाली सुरु होती तस्करी, वैभववाडीत 41 लाखांचा मुद्देमाल जप्त

Goa Accident: राज्यात रस्ते अपघातात वाढ, 2022 पासून आतापर्यंत 843 जणांचा मृत्यू; मुख्यमंत्र्यांची माहिती

Pakistan: 'सात पाऊले चल, मग गोळी मार...', पाकिस्तानमध्ये ऑनर किलिंगचा थरकाप, जोडप्याचा VIDEO व्हायरल!

Goa Assembly: अर्थसंकल्पीय भाषणात आमदार गोविंद गावडे यांनी मुख्यमंत्र्यांवर साधला निशाणा; वाचा दिवसभरातील घडामोडी

3.50 लाख रुपये देऊन गोव्यात मिळवली पोस्टमनची नोकरी; 40 गोमंतकीयांना कमी करुन 50 महाराष्ट्रातील उमेदवारांची भरती - सरदेसाई

SCROLL FOR NEXT