cricket betting racket in Goa Dainik Gomantak
गोवा

Goa Betting Links: क्रिकेट सट्टेबाजी अन् मनी लॉन्ड्रिंगचे धागेदोरे अखेर गोव्यापर्यंत; वर्ध्यातील बडे क्रिकेट बुकी पोलिसांच्या रडारवर

Wardha Police Cricket Betting Case: मनी लॉन्डरिंग प्रकरणाच्या तपासात महाराष्ट्रातील वर्धा पोलिसांना आता गोव्याचे धागेदोरे समोर येऊ लागल्याने तपासाची व्याप्ती आणखी वाढविण्यात आली आहे.

दैनिक गोमन्तक डिजिटल

पणजी: ऑनलाईन क्रिकेट सट्टेबाजी, बेकायदेशीर आर्थिक व्यवहार आणि मनी लॉन्डरिंग प्रकरणाच्या तपासात महाराष्ट्रातील वर्धा पोलिसांना आता गोव्याचे धागेदोरे समोर येऊ लागल्याने तपासाची व्याप्ती आणखी वाढविण्यात आली आहे. या प्रकरणात वर्ध्यातील काही नामांकित क्रिकेट बुकी पोलिसांच्या रडारवर आले असून, काही संशयित सध्या संपर्काबाहेर असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

काही बुकी गोव्यातील एका विशिष्ट ठिकाणी वास्तव्यास असल्याचा संशय पोलिसांना आहे. त्यासाठी वर्धा पोलिस गोव्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. या प्रकरणात यापूर्वी तन्मय भगत आणि सनी होलानी यांच्याविरोधात फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्यात आले होते. बोरगाव येथील दगड खाणी परिसरातील रहिवासी प्रतीक लोखंडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा नोंदविण्यात आला होता.

सनी होलानी सध्या बेपत्ता असून, त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी विशेष मोहीम सुरू केली आहे.तपासादरम्यान पोलिसांना धक्कादायक माहिती मिळाली असून, तन्मय भगत आणि सनी होलानी यांचे मागील दोन वर्षांपासून अनेक क्रिकेट बुकींशी घनिष्ठ संबंध असल्याचे उघड झाले आहे.

भगतशी पोलिस अधिकाऱ्याचे संबंध?

काही विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एका पोलिस अधिकाऱ्याचे तन्मय भगत याच्याशी निकट संबंध होते. संबंधित अधिकारी भगतच्या आवडीच्या ठिकाणी आणि हॉटेलमध्ये वारंवार जात असल्याचा तसेच त्याच्याशी सातत्याने संपर्कात असल्याचा दावा सूत्रांनी केला आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असून सर्व पैलूंनी चौकशी केली जात आहे. संबंधित आरोपींना लवकरच अटक करण्यात येईल, अशी माहिती वर्धा शहर पोलिस निरीक्षक संतोष तळे यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Weather Update: राज्यात पावसाचा जोर ओसरणार? कमी दाबाच्या पट्ट्यामुळे झालेल्या पावसानंतर पुढील 4 दिवस तुरळक सरींचा अंदाज, शेतकऱ्यांची चिंता कायम

VIDEO: भाजपवर सरदेसाईंचा जोरदार हल्लाबोल; 'वोट चोरी'चा आरोप करत म्हणाले, विधानसभा निवडणूक हलक्यात घेता येणार नाही

8th Pay Commission: 45,000 किमान पेन्शन मिळणार? 8व्या वेतन आयोगासमोर पेन्शनर्सनी मांडल्या ‘या’ मागण्या

West Zone Athletics: पश्चिम विभागीय ॲथलेटिक्ससाठी गोवा सज्ज, यजमानांचा 124 सदस्यीय संघ; स्पर्धा रविवारपासून अटल स्टेडियमवर

Vasco: एकाच मार्गावर वेगवेगळी वेगमर्यादा, वास्कोतील वाहनचालक चक्रावले; दोन सरकारी खात्यांत समन्वयाचा अभाव

SCROLL FOR NEXT