GMC Goa | Goa Corona Update Dainik Gomantak
गोवा

Goa Corona Update: वाढत्या कोविड संक्रमणांवर आळा घालण्यासाठी सरकार प्रयत्नशील; GMC मध्ये एक वॉर्ड राखीव

गोव्यात सध्या कोविड पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये वाढ होत आहे.

दैनिक गोमन्तक

Goa Corona Update: गोव्यात सध्या कोविड पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर सरकारने शनिवारी जाहीर केले आहे की, सावधगिरीचा उपाय म्हणून GMC मधील एक वॉर्ड कोविड रूग्णांसाठी राखीव ठेवला जाईल.

याबाबत माहिती देताना आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी मात्र कोविडची वाढती प्रकरणे पाहता राज्यात नागरिकांना खबरदारीने राहण्यास सांगितले आहे. ते म्हणाले की, गोवा कोविडशी संबंधित सर्व केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करेल आणि याचा धोका वाढण्यापासून रोखेल.

दरम्यान, गोव्यात शनिवारी कोरोना संसर्गाची 34 नवीन प्रकरणे नोंदवली गेली तरीही अनेक महिन्यांच्या कालावधीनंतर सहा कोविड रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

आरोग्य सेवा संचालनालयाच्या आरोग्य बुलेटिनमध्ये असे म्हटले आहे की राज्यात सक्रिय कोविडची संख्या 190 झाली असून गेल्या 24 तासांत चाचणी केलेल्या 621 नमुन्यांमधून 34 नवीन कोविड प्रकरणे आढळून आली आहेत. याबाबत राज्य सरकार आता सतर्क झाले असून मुख्यमंत्र्यांनीही वाढत्या कोविड संक्रमणांवर आळा घालण्यासाठी नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Battle of Galwan: रक्ताने माखलेला चेहरा, हातात धारदार शस्त्र अन् डोळ्यात देशभक्तीची चमक, 'गलवान'मधील सलमानचा पहिला लूक आला समोर

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

SCROLL FOR NEXT