Short film

 

Dainik gomantak

गोवा

लघुपट निर्मिती स्पर्धेत 'वागरो'चे वर्चस्व, सात पुरस्कारांचे मानकरी

दैनिक गोमन्तक

सासष्टी : रवीन्द्र भवन मडगाव व माहिती व प्रसिद्धी संचालनालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या साठ तासामध्ये लघुपट निर्मिती करण्याच्या स्पर्धेत "वागरो" या लघुपटाने एकूण सात पारितोषिके मिळवत आपले वर्चस्व गाजवले. हा लघुपट दिग्दर्शीत करणारा साईनाथ उसकईकर सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक ठरला तर याच लघुपटातील श्रवण फोंडेकर सर्वोत्कृष्ट अभिनेता व सोबिता कुडतरकर सर्वोत्कृष्ट अभिनेती ठरली.

स्क्रीन प्लेसाठी याच लघुपटाच्या साईनाथ उसकईकर व सर्वोत्कृष्ट सिनेमाटोग्राफर म्हणून लघुपटाच्या अमेय सिमेपुरुसकर यांना बक्षिस मिळाले. सर्वोत्कृष्ट ध्वनी संकलनासाठी वागरोच्याच अभिषेक कदम व व्यंकटेश लागजी यांची निवड झाली.

दुसऱ्या बक्षिसासाठी संकेत न्हायागिंकर दिग्दर्शित रेजिलियन्स तर तिसऱ्या बक्षिसासाठी येलो लेटर या लघुपटांची निवड झाली. इतर महत्वाचे पुरस्कार -  सर्वोत्कृष्ट बाल कलाकार (Artist) - अवनिश सतीश नार्वेकर (येलो लेटर), सर्वोत्कृष्ट एडिटिंग - कबीर नाईक (आशा), सर्वोत्कृष्ट कथानक - वैभव नाईक (मीठ-सॉल्ट), उत्तेजनार्थ लघुपट - करेक्ट चॉईस, दृष्टिकोन, मीठ(सॉल्ट), मुक्ती, काल, द वर्टिकल फेथ, सोल मेट, खास ज्युरी पारितोषिके - दिग्दर्शक - संकेत न्हायागिंकर (रेजिलियन्स) व सिनेमाटोग्राफी - कबीर नाईक (आशा).

स्पर्धेचे परिक्षक म्हणून शर्मद पै रायतुरकर, राजेश पेडणेकर व उज्वला तारकर यांनी काम पाहिले. सेलेब्रिटी परिक्षक म्हणून आंतरराष्ट्रीय ख्यातीचे सिनेनिर्माते मनोज कदम हे होते.  पारितोषिक वितरण सोहळ्यास सिनेनिर्माता व दिग्दर्शक राजेन्द्र तालक प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. 

नवी तरुण पिढी फिल्म क्षेत्रांमध्ये प्रवेश करीत आहे ही चांगली गोष्ट आहे, असे तालक यांनी म्हटले. साठ तासात लघुपट निर्मिती करणे हे आव्हान असून लघुपट निर्मिती ही स्थानिक स्तरावरुन जागतिक स्तरावर पोहोचण्याची पहिली पायरी असल्याचे कदम यांनी सांगितले. वागरो लघुपटाचे दिग्दर्शक (Director) साईनाथ उसकईकर यांनी या पुरस्कारांचे (Awards) श्रेय आपल्या संपूर्ण टीमला असल्याचे सांगितले. आंतरजातीय विवाह केलेल्यांसाठी हा लघुपट आपण समर्पित करतो असेही त्यांनी सांगितले.

रवीन्द्र भवन मडगावच्या सदस्य सचिव संध्या कामत यांनी सर्वांचे स्वागत केले तर कार्यकारी समिती सदस्य अनिल रायकर यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ. रुपा च्यारी यानी केले. स्पर्धेचे संयोजन अमोल आजगावकर व संग्राम सिंग गायकवाड यांनी केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

St. Francis Xavier DNA Test Row: वेलिंगकरांविरोधात रस्त्यावर उतरलेल्या आंदोलकांची माघार! राजकीय मायलेजचा मुद्दा नडला

शाळकरी मुलांच्या बाबतीत आपण किती जागरूक, शिक्षित आणि गंभीर आहोत?

विजयनगर साम्राज्य, गोव्याचा संदर्भ; मदुराई आणि कुमार कंपण्णांचा इतिहास याबद्दल जाणून घ्या

Top Most Polluted Countries: जगातील 'हे' 8 देश सर्वाधिक प्रदूषित; क्रमवारीत भारत तिसऱ्या क्रमांकावर!

Goa Politics: दिल्लीत नेमके 'काय' घडले? 'कुणाला' समज, 'कुणाला' आदेश..

SCROLL FOR NEXT