गोवा राज्यात निर्बंध, नव्या गाईडलाईन जारी

ओमिक्रॉनचा (omicron variant) प्रसार रोखण्यासाठी उपाययोजना सुरु केल्या आहे. परदेशातून गोव्यात दाखल होणाऱ्या प्रवाशांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात येत आहे.
omicron variant

omicron variant

Dainik Gomantak 

देशात ओमिक्रॉन व्हेरिएंटचा प्रसार वेगाने वाढू लागला आहे. त्यामुळे अनेक राज्यांनी पुन्हा एकदा कोरोना निर्बंध लागू करण्यास सुरुवात केली आहे. यातच आता गोवा सरकारने खबरदारी म्हणून ओमिक्रॉनचा (omicron variant) प्रसार रोखण्यासाठी उपाययोजना सुरु केल्या आहे. परदेशातून गोव्यात दाखल होणाऱ्या प्रवाशांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात येत आहे. त्याचबरोबर कोरोना पॉझिटीव्ह आढळणाऱ्या प्रवाशांना तात्काळ उपचारासाठी रुग्णलयात भरती करण्यात येत आहे.

दरम्यान, सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी परराज्यातील नागरीक गोव्यात दाखल होऊ लागल्यामुळे कोरोनाचा धोका आणखी वाढला आहे. त्यामुळे राज्य सरकारने खबरदारी म्हणून कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी ठोस पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. यातच काही निर्बंध लावण्यासही सुरुवात केली आहे. काही दिवसांपूर्वीच राज्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत (chief minister pramod sawant) यांनी स्पष्ट केले होते की, ''गोवा (Goa) पर्यटन राज्य असल्याने योग्य तात्काळ निर्बंधाचा विचार करणे घाईगडबडीचे होईल.''

<div class="paragraphs"><p>omicron variant</p></div>
लीज बाहेरील खनिज डंपचा लिलाव करणार : मुख्यमंत्री

त्यामुळे सरकारने खबरदारी म्हणून कोरोना प्रोटोकॉलचे नागरिकांनी पालन करावे यासाठी काही नियमांची पुन्हा एकदा नव्या गाईडलाईन जारी केल्या आहेत.

 • सरकारने रात्रीचा कर्फ्यू लागू करण्याचा गांभीर्याने विचार केला आहे.

 • हॉटेलमधील सर्व रहिवाशांची RTPCR चाचणी आवश्यक असणार आहे.

 • सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या 1000 च्या वर गेल्यास आणि साप्ताहिक पॉझिटीव्ही रेट 3.5 टक्क्यांच्या वर गेल्यास शाळा बंद केल्या जातील.

 • सरासरी साप्ताहिक दर 3.5 टक्क्यांच्या पुढे गेल्यास हॉटेल व्यवसाय, रेस्टॉरंट 50 टक्के क्षमतेने चालवले जावेत.

 • सरासरी साप्ताहिक पॉझिटीव्हीटी रेट 3.5 टक्क्यांपेक्षा जास्त असल्यास 50 टक्के क्षमतेसह हॉल किंवा कार्यक्रमांमध्ये एकत्र येण्यास बंदी घालण्यात येईल.

 • जर सरासरी पॉझिटीव्हीटी रेट 7.5 टक्क्यांच्या वर गेला आणि सक्रिय प्रकरणे 3000 च्या वर गेल्यास सर्व पर्यटन क्रियाकलाप बंद केले जावेत.

 • जर पॉझिटीव्हीटी रेट दर 15 टक्क्यांच्या पुढे गेला तर एकूणच सर्व बंद राहील.

 • क्लब आणि रेस्टॉरंट्स फक्त 50 टक्के क्षमतेने सुरु राहणार आहेत.

 • अपार्टमेंटमध्येही पार्ट्या किंवा डीजेवर बंदी घालण्यात आली असून, रहिवाशांच्या संघटनांना नियमांचे उल्लंघन होणार नाही याची काळजी घ्यावी लागणार आहे.

 • बॅन्क्वेट हॉल इव्हेंट्ससारख्या इनडोअर पार्ट्यांना 50 टक्के अतिथी क्षमतेपर्यंत परवानगी आहे.

 • दुकाने, मॉल्स, कार्यक्रम केवळ लसीकरण झालेल्या लोकांकडूनच हाताळले जातील.

 • COVID-19 प्रोटोकॉलचे नागरिकांनी पालन करावे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com