चेकपोस्ट वरून पर्यटकांची राज्यात मोकाट 'एन्ट्री'

अजूनही सरकारला गांभीर्य नाहीच..
Goa Tourism: Tourists enter state from checkposts without any Guidelines

Goa Tourism: Tourists enter state from checkposts without any Guidelines

Dainik Gomantak

Published on
Updated on

Goa: राज्यात नागरिक बेफिकीरपणे फिरताना दिसत आहेत. शिवाय पर्यटन (Goa Tourism)हंगामाच्या नावाखाली राज्यातील चित्र भयानक होत चालले आहे. राज्यात येणाऱ्या पर्यटकांची कुठेच करोना चाचणी होताना दिसत नाहीये, गेल्या काही दिवसांपूर्वी राज्यात ओमिक्रोन (Omicron) पॉसिटीव्ह रुग्ण आढळून आला आहे.

<div class="paragraphs"><p><strong>Goa Tourism: </strong>Tourists enter state from checkposts without any Guidelines</p></div>
मेळावली ग्रामबचाव आंदोलन समितीला खासदार सुश्मिता देव यांचा पाठिंबा

ही बाब देखील गांभीर्याने घेतली जात नाही. एक पात्रादेवी चेकपोस्ट सोडला तर इतर सीमांवर कडक चौकशी होताना दिसत नाही. सातार्डा,पर्ये, चंदेल याठिकाणांहून नागरिक अगदी सहजरित्या राज्यात प्रवेश करत आहेत. पर्यटक (Tourism) वाढत असताना या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा अहवाल तपासला जात नाही आहे. कोविड प्रोटोकॉलचे पालन होताना दिसत नाही आहे, आणि ही राज्यासाठी धोक्याची घंटा ठरू शकते.

सणासुदीच्या हंगामामुळे तेजीत असलेल्या पर्यटन व्यवसायात अडथळा आणू नये यासाठी गोवा सरकारने (Goa Government) राज्यात रात्रीचा कर्फ्यू पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला होता. “जर प्रकरणे वाढतच गेली तर सोमवारनंतर आम्ही कठोर पावले उचलू”, असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सांगितले होते. "31 डिसेंबरपर्यंत पर्यटन हंगाम आहे म्हणूनच आम्ही घाईघाईने निर्णय घेऊ शकत नाही कारण यामुळे पर्यटन उद्योगावर परिणाम होईल. लसीकरण आणि कोविड प्रोटोकॉलचे काटेकोरपणे पालन करणे हा एकमेव उपाय आहे, असेही ते म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com