Voting message to bicholim voters on evening of Christmas

 

Dainik Gomantak

गोवा

'ख्रिसमस'च्या मुहूर्तावर डिचोलीकरांना मतदानाचा संदेश

'ख्रिसमस'चा उत्साह पसरला असतानाच शहरात साकारलेल्या येशू जन्मावरील भव्य देखाव्याच्या ठिकाणी मतदानाच्या हक्काविषयी फलक

दैनिक गोमन्तक

डिचोली: ख्रिस्ती बांधवांचा उत्साह द्विगुणित करणाऱ्या नाताळ सणाचे डिचोलीत उत्साहात स्वागत करण्यात आले असून, सर्वत्र 'ख्रिसमस'चा माहोल पसरला आहे. एकाबाजूने 'ख्रिसमस'चा उत्साह पसरला असतानाच शहरात साकारलेल्या येशू जन्मावरील भव्य देखाव्याच्या ठिकाणी मतदानाच्या हक्काविषयी फलक लावून मतदारांना योग्य संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

ख्रिसमस'ची धूम

शुक्रवारी रात्री शहरातील अवरलेडी ऑफ ग्रेस सायबिणीच्या चर्चमध्ये प्रार्थनासभा आदी कार्यक्रम झाल्यानंतर मध्यरात्री घंटानाद करीत आणि एकमेकांना शुभेच्छा देत 'ख्रिसमस'चे जल्लोषात स्वागत करण्यात आले. 'ख्रिसमस' निमित्त अवरलेडी ऑफ ग्रेस सायबिणीच्या चर्चची रंगरंगोटी करून आकर्षक विद्युत रोषणाई तसेच आकर्षक सजावट करण्यात आली आहे. शहरात विविध ठिकाणी देखावे साकारण्यात आले आहेत. ख्रिस्ती बांधवांनी घरांवर रंगीबेरंगी नक्षत्रे लावली असून, विद्युत रोषणाई आणि गोठा आदी सजावटही केली आहे. शहरात सर्वत्र 'ख्रिसमस'ची (Christmas) धूम पसरली असून, नववर्षाचे स्वागत केल्यानंतरच नाताळचा जल्लोष मावळणार आहे.

मतदानाबाबत संदेश

अवरलेडी चर्च परिसरात तर यंदा येशू ख्रिस्ताच्या जन्मावर आधारीत भव्य आणि आकर्षक देखावा साकारण्यात आला असून, हा देखावा पाहण्यासाठी नागरिक गर्दी करीत आहेत. निवडणुकीच्या (Goa Election) पार्श्वभूमीवर देखाव्याच्या ठिकाणी तर गोव्याच्या (Goa) नकाशाची प्रतिकृती आणि विविध आशयाचे फलक लावून मतदारांमध्ये (Voters) जागृती करण्याचा प्रयत्न करतानाच मतदारांना योग्य असा संदेश देण्यात आला आहे. 'माय वोट नॉट फॉर सेल', 'बी ब्राईट, वोट फॉर राईट', 'जो बांटे दारू, साडी, नोट-उसको कभी न देंगे वोट' आदी आशयाचे फलक तर हा देखावा पाहण्यासाठी येणाऱ्या प्रत्येकाला आकर्षित करीत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IPL Jersey Stolen: BCCI च्या ऑफिसमध्ये 6.52 लाखांची चोरी; मुंबई, चेन्नईसह अनेक IPL संघांच्या जर्सी गायब, सुरक्षा व्यवस्थापकाविरोधात गुन्हा दाखल

Tigers In Goa: माणसाच्या उत्पत्तीपूर्वीपासून पृथ्वीवर असलेले, वाघुर्मे गावात देवासारखे पुजले जाणारे 'वाघ' आम्हाला नकोसे झालेत का?

Goa Assembly Session: आलेमाओ यांनी सभागृहाला स्ट्रीट प्रोव्हिडन्सच्या वापर प्रमाणपत्राची माहिती दिली

Love Horoscope: मनातल्या भावना व्यक्त करायची हीच योग्य वेळ, तुमची 'चंद्र रास' काय सांगते? वाचा

Goa Opinion: कोण म्हणतंय पत्रकारिता संपली?

SCROLL FOR NEXT