Vishwajeet Rane protest

Vishwajeet Rane protest

Dainik gomantak

गुळेली सत्तरीत भाजप सरकारचा निषेध, आरोग्यमंत्री फिरकलेच नाहीत

मेळावली वासियांनी गुळेली येथे रस्त्यावर थांबून भाजप सरकार व आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांचा जाहीर निषेध व्यक्त केला.
Published on

गुळेली सत्तरी येथे आज शनिवारी सायंकाळी 7 वाजता एका संस्थेचा वर्धापन दिन कार्यक्रम होता. या कार्यक्रमाला आरोग्यमंत्री विश्वजीत राणे येणार होते. तसे जाहिरात फलकावर नमुद होते. त्यावरुन मेळावली वासिय कार्यक्रमाच्या ठिकाणी बाहेर रस्त्यावर एकत्र जमा झाले होते. हातात काळे फलक घेऊन उभे होते. पण कार्यक्रमाला आरोग्यमंत्री आले नाहीत. मेळावली वासियांनी गुळेली येथे रस्त्यावर थांबून भाजप सरकार व आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांचा जाहीर निषेध व्यक्त केला.

<div class="paragraphs"><p>Vishwajeet Rane protest</p></div>
त्या आमदाराकडून जीवाला धोका, अ‍ॅड. रॉड्रिग्ज यांची पोलिसात धाव

नागरिक शुभम शिवोलकर म्हणाले आज गुळेलीत एका कार्यक्रमाला राणे येणार होते. मात्र ते आमची भिती बघून बहुदा फिरकलेच नाही. भाजप सरकारने (BJP government) आम्हाला खोट्या गुन्हात अडकवले आहे. विश्वजीत राणेंनी (Vishwajeet Rane) आमच्यावर अन्याय केला आहे. त्यांना सामान्य लोकांचे काहीच पडलेले नाही. मेळावली वासियांनी आजही एकजूट ठेवली आहे. म्हणूनच आमचे आंदोलन आजही तेवढ्याच जोमात सुरु आहे. एकीचे बळ हेच सत्य आहे. ते आम्ही दाखवून दिले आहे. गुळेली पंचायत (Panchayat) कार्यालयात आमचे आंदोलन (Movement) सकाळचे सुरुच राहणार आहे. भाजपच (BJP) सरकार व त्यांचे मंत्री डोळून मिटून आहेत. जर सरकारने लोकांवरील विविध लादलेले गुन्हे मागे घेतले नाही. तर आम्ही आरोग्यमंत्र्यांन विरोधात राज्यभर रँली काढणार आहोत. त्याची सुरुवात सत्तरीत तालुक्यातून लवकरच केली जाईल.

<div class="paragraphs"><p>Vishwajeet Rane protest</p></div>
'स्वच्छ व सुंदर साखळी' हेच आपले ध्येय: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

आमचे आंदोलन सत्याच्या बाजूने आहे. कोणत्याही परिस्थितीत जिंकल्या शिवाय गप्प बसणार नाही असा खणखणीत इशारा शिवोलकर व उपस्थित नागरिकांनी दिला आहे. भाजप सरकार मुर्दाबाद अशा जोरदार घोषणा गर्जना यावेळी देण्यात आल्या. आज पुन्हा मेळावली वासियांनी काळ्या बावट्यांनी राज्यभरातून सर्वांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे. नागरिकांवरील विविध गुन्हे मागे घ्यावेत, आयआयटी संस्थेला दिलेली जमीन पुन्हा सरकारने ताब्यात घ्यावी, पंचायत संचालनालयतील 'ना हरकत दाखला' प्रकरण संपुष्टात आणून 'ना हरकत दाखला' आयआयटी संस्थेला देऊ नये या प्रमुख मागण्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com