Goa Corporation Elections 2023 Dainik Gomantak
गोवा

Goa Elections: साखळी, फोंडा नगरपालिकेचे धुमशान सुरू; 'या' दिवशी मतदान, जाणून घ्या सविस्तर कार्यक्रम...

राज्य निवडणूक आयोगाने केली घोषणा; आचारसंहिता लागू

Akshay Nirmale

Goa Elections: गेल्या काही दिवसांपासून लक्ष लागून राहिलेल्या साखळी आणि फोंडा नगरपालिका निवडणुकीच्या तारखा अखेर, शनिवारी राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केल्या. या दोन्ही नगरपालिकांसाठी 5 मे रोजी मतदान होणार आहे, तर 7 मे रोजी मतमोजणी होईल.

मतदानाच्या तारखेच्या घोषणांबरोबरच दोन्ही नगपालिका क्षेत्रात आज, शनिवारपासून आचारसंहिता लागू झाल्याचीही घोषणा, राज्य निवडणूक आयुक्त डब्ल्यू. व्ही. रमणमुर्ती यांनी दिली आहे.

फोंडा पालिकेत 15 तर सांखळी पालिकेत 12 वॉर्ड आहेत. फोंड्यात एकूण 16305 इतके तर सांखळीत 8640 इतके मतदार आहेत. सकाळी 8 ते सायंकाळई 5 या वेळेत मतदान करता येईल. पैकी शेवटचा तास म्हणजेत सायंकाळी 4 ते 5 ही वेळी कोरोना रूग्णांना मतदान करण्यासाठी असेल.

दोन्ही पालिकांसाठी मतपत्रिकेवर मतदान होणार आहे. उमेदवाराला दोन लाख रूपये इतकी खर्च मर्यादा आहे. साखळी आणि फोंडा नगरपालिकांच्या सध्याच्या सभागृहाची मुदत संपत आली आहे. दरम्यान, निवडणुकांच्या पार्श्वभुमीवर अनेक इच्छुक उमेदवार तयारीला लागले आहेत.

असा आहे निवडणूक कार्यक्रम

  • अर्ज दाखल करण्याची मुदत ---- 10 एप्रिल ते 18 एप्रिल

  • अर्ज छानणी ---------- 19 एप्रिल

  • अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत ---------- 20 एप्रिल

  • मतदान ---------------- 5 मे

  • मतमोजणी ------------ 7 मे

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Katrina Kaif Baby Boy: आई-बाबा झाले कतरिना कैफ- विकी कौशल! लग्नाच्या 4 वर्षांनी चिमुकल्याचे आगमन, PHOTO पोस्ट करत दिली माहिती

BJP X INC Goa: काँग्रेस विद्यार्थी संघटनेने दामू नाईकांसाठी बुक केली मानसोपचारतज्ज्ञांची अपॉइंटमेंट

Ranji Trophy 2025: रजत पाटीदारला रोखण्यासाठी 'मास्टरप्लॅन'! गोवा संघात खास गोलंदाजाची एन्ट्री, फलंदाजाची धाकधूक वाढली

Goa Today's News Live: साळगाव खून प्रकरण; संशयितांना लवकरच अटक केली जाईल, मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

Water Metro Goa: ‘वॉटर मेट्रो’साठी पुढचे पाऊल! अभ्यास पथकाची 28 ठिकाणी भेट; अहवाल पाठवणार पुढे

SCROLL FOR NEXT