Court
CourtDainik Gomantak

Goa Land Grab Case: पतीच्या निधनानंतर 'ती'ने दिला निकराचा लढा, बळकावलेली जमीन अखेर 10 वर्षानंतर मिळाली परत

म्हापसा न्यायालयाने दिले आदेश; सुकूरमध्ये लाटली होती जमीन
Published on

Goa Land Grab Case: कायदेशीर लढाईत जवळपास एक दशक लोटल्यानंतर मुंबईतील डॉ. सँड्रा सौझा यांना त्यांच्या पतीच्या सुकूर येथील हक्काची जमीन परत मिळाली आहे. तसे आदेश म्हापसा न्यायालयाने दिले आहेत. या जमीनीचे क्षेत्रफळ 1,525 चौरस मीटर इतके आहे.

म्हापसा दिवाणी न्यायालयातील न्यायाधीश शिल्पा पंडित यांनी 25 सप्टेंबर 2013 रोजीचा या जमीनीच्या खरेदीबाबतचा नोंदणीकृत विक्री करार रद्दबातल ठरविण्याचा आदेश मार्च 2023 मध्ये दिला.

न्यायाधीशांनी बार्देशच्या उपनिबंधकांना विक्री करार रद्द करण्याचे आदेश दिले आहेत. चौकशीत ही मालमत्ता गोवा वेल्हा येथील रहिवासी एस्टेव्हन डिसोझा आणि पणजी येथील अब्दुल अजीज खान यांना बनावट कागदपत्रांद्वारे विकली गेली होती, असे समोर आले आहे.

Court
Goa G20 Meeting 2023: गोव्यातील G20 बैठकीसाठी 'कदंबा'च्या नवीन ईव्ही बसेस दाखल

सँड्रा सौझा यांचे दिवंगत पती फ्रान्सिस डिसोझा यांची ही जमीन होती. जी त्यांना त्यांच्या आईकडून वारसाहक्काने मिळाली होती. 21 एप्रिल 2013 रोजी सौझा यांच्या पतीचा मृत्यू झाला. त्यानंतर चार महिन्यांनी या मालमत्तेची विक्री पॉवर ऑफ अॅटर्नी (PoA) द्वारे केली गेली होती. तथापि, पती हयात नसताना ते ही मालमत्ता विकू शकत नाहीत, हे सौझा यांनी न्यायालयात सिद्ध केले.

घोटाळेबाजांनी नेहमीची मोडस ऑपरेंडी वापरून बनावट कागदपत्रांधारे ही जमीन विकली. फेरफार प्रक्रियेस विलंब लागतो पण या जमिनीबाबत ही प्रक्रिया 24 तासांत झाली होती.

Court
गोव्यातील मंत्री-आमदारांमध्ये दिसून आला खास 'याराना'; ऐन उन्हाळ्यात कूल काश्मिर सफारी

स्थानिक वृत्तपत्रात नोव्हेंबर 2013 मध्ये एस्टेव्हन डिसोझा यांच्या नावे फेरफार करण्यासाठी नोटीस प्रकाशित झाली तेव्हा सौझा यांनी आक्षेप घेतला. त्यांनी दिलेल्या मुदतीत मामलेदार कार्यालयात लेखी आक्षेप नोंदवल्याचे सांगितले.

सेल डीडमध्ये एक चूक होती. जमीनीचे क्षेत्रफळ 1,525 चौरस मीटरऐवजी 1,550 चौरस मीटर दाखवले होते.

कोर्टात, एस्टेव्हनने दावा केला की त्याची मालमत्ता हडप करण्यासाठी आणि त्याचा छळ करण्यासाठी त्याच्याविरुद्ध खटला दाखल करण्यात आला. तर खान याने म्हटले होते की, फ्रान्सिस डिसोझा (मृत मालक) यांनी मोसेस फर्नांडिस याला त्याचा पॉवर ऑफ अॅटर्नी म्हणून नियुक्त केले होते.

फर्नांडिसने खानला संपर्क साधून डिसूझाला त्याची मालमत्ता विकण्यात रस असल्याची माहिती दिली. या प्रकरणाचा तपास सुरुवातीला गोवा पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने केला होता. त्यानंतर गेल्या वर्षी हा तपास एसआयटीकडे दिला गेला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com