Amarnath Panjikar Dainik Gomantak
गोवा

Karnataka Election Result 2023 : हुकूमशाही आणि महागाईच्या विरोधात लोकांचा कौल- पणजीकर

देशात चालणारी हुकूमशाही, खोटेपणा, आणि धर्माच्या नावावर केलं जाणारं राजकारण हे फार काळ टिकणारं नाही

गोमन्तक डिजिटल टीम

Karnataka Election Result 2023 कर्नाटकच्या यंदाच्या विधानसभा निवडणुकीत भाजपला मतदारांनी धक्का दिला आहे. विशेष म्हणजे, खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा करिष्मा देखील कर्नाटकात भाजपची सत्ता वाचवू शकलेला नाही. कर्नाटक निवडणुकीत काँग्रेसला बहुमत मिळाल्यानंतर गोवा काँग्रेसचे अमरनाथ पणजीकर यांनी नुकतीच आपली प्रतिक्रिया व्यक्त केलीय.

आज कर्नाटकात निवडणुकीत जे काँग्रेस पक्षाला जनतेने बहुमत दिलंय त्याबद्दल काँग्रेसच्या गोटात आनंदच वातावरण आहे.

आजचा विजय हा कर्नाटकातील काँग्रेसचे नेते, काँग्रेसचे कार्यकर्ते यांच्या मेहनतीचे फळ आहे. त्यांना मी मनापासून शुभेच्छा देतो असे गोवा काँग्रेसचे अमरनाथ पणजीकर यांनी सांगितले आहे.

पणजीकर म्हणाले, कर्नाटकातील जनतेने हे दाखवून दिलंय की, देशात चालणारी हुकूमशाही, खोटेपणा, आणि धर्माच्या नावावर केलं जाणारं राजकारण हे फार काळ टिकणारं नाहीय.

या विजयाबद्दल मल्लिकार्जुन खर्गे, सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियांका गांधी कर्नाटकातील काँग्रेसचे नेते डि के शिवकुमार यांचं मी मनापासून अभिनंदन करतो.

या निवडणुकीतील विजयाने एक गोष्ट दाखवून दिलीय की, 2014 च्या निवडणुकीत मोदी सरकारने महागाई, नोकऱ्यांची उपलब्धता याबाबत जी खोटी आश्वासनं दिली होती ती जनतेने खोडून काढली आहेत.

2024 मध्ये देशातून हे जुलूमशाहीचं आणि खोटेपणाचे सरकार जाऊन लोकांचे हित जपणारे काँग्रेसचे सरकार येणार आहे. कर्नाटकीतील विजयामुळे आम्हालाही ऊर्जा मिळाली असून हीच ऊर्जा घेऊन आम्ही गोव्यात देखील काँग्रेसचे सरकार आणणार आहोत.

तसेच आम्हाला खात्री आहि की गोव्यातील जनता सुद्धा गोव्यात काँग्रेसचे सरकार आणण्यासाठी निश्चित सहकार्य करणार आहे असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: दुकानातला QR कोड काढला आणि स्वतःचा लावला, महिला कर्मचाऱ्याने गंडवले मालकालाच; 49 लाख पळवले

Goa Assembly Election 2027: 'पणजीतून अपक्ष उमेदवार म्हणूनच निवडणूक लढवणार'! उत्पल पर्रीकर यांनी केले जाहीर

'2023 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध, सुपर-8 मध्ये आफ्रिकेविरुद्ध भारत हारला तरी..', ऑस्ट्रेलियाच्या कॅप्टनने भारतीय संघाबाबत असे काही बोलला की..

VIDEO: गॅसतुटवडा प्रकरण पेटले, सिलिंडर पोचवणाऱ्या गाडीवर कुंकळ्ळीत हल्ला; दोघे गंभीर

IPL 2026: संजू सॅमसन घेणार 'धोनी'ची जागा? दिग्गज क्रिकेटपटूच्या वक्तव्यामुळे रंगली चर्चा; उपकर्णधारपदाचे वर्तवले भाकीत

SCROLL FOR NEXT