Rahul Gandhi Karnataka Result: 'द्वेषाचा बाजार बंद, प्रेमाचे दुकान सुरु...', कर्नाटकातील काँग्रेसच्या विजयानंतर राहुल गांधींची प्रतिक्रीया

Karnataka Election News: काँग्रेसने 136 जागा जिंकून भाजप सरकारचा पाडाव केला आहे. या ऐतिहासिक विजयामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे.
Rahul Gandhi
Rahul Gandhi Dainik Gomantak
Published on
Updated on

Karnataka Assembly Election Results 2023: कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने दणदणीत विजय मिळवला आहे. काँग्रेसने 136 जागा जिंकून भाजप सरकारचा पाडाव केला आहे. या ऐतिहासिक विजयामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे.

त्याचबरोबर काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी कर्नाटकातील जनतेचे आभार मानले आहेत. राहुल म्हणाले की, 'कर्नाटकात द्वेषाचा बाजार बंद झाला असून प्रेमाचे दुकान उघडले आहे.'

दरम्यान, आम्ही कर्नाटकच्या (Karnataka) जनतेला 5 आश्वासने दिली होती, ही आश्वासने पहिल्याच मंत्रिमंडळात पहिल्याच दिवशी पूर्ण करु, असे काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी म्हणाले. कर्नाटकातील गरीब जनतेने काही उद्योगपतींचा पराभव केला असल्याचेही यावेळी राहुल म्हणाले.

Rahul Gandhi
Karnataka Assembly Election Results 2023: 'माझा दादा मुख्यमंत्री व्हावा...', डीके शिवकुमार यांच्या भावाचं मोठं वक्तव्य

राहुल पुढे म्हणाले की, 'मी कर्नाटकातील आमच्या कार्यकर्त्यांचे आणि नेत्यांचे अभिनंदन करतो. काँग्रेस पक्ष कर्नाटकातील गरिबांच्या पाठीशी उभा राहिला. ही लढाई आम्ही प्रेमाने लढलो. विशेष म्हणजे, या देशावर प्रेम आहे हे कर्नाटकने दाखवून दिले.'

राहुल गांधी पुढे असेही म्हणाले की, 'कर्नाटक निवडणुकीत एका बाजूला क्रोनी भांडवलदारांची सत्ता होती, तर दुसऱ्या बाजूला गरीबांची सत्ता होती.

या निवडणुकीत काँग्रेस (Congress) गरिबांच्या पाठीशी उभी राहिली. आम्ही द्वेषाच्या राजकारणाचा मुकाबला केला. कर्नाटकातील जनतेने या देशावर प्रेम असल्याचे दाखवून दिले. कर्नाटकात द्वेषाचा बाजार बंद झाला आणि प्रेमाची दुकाने उघडली.'

Rahul Gandhi
Karnataka Assembly Elections 2023 Results: काँग्रेस अन् जेडीएस संपूर्ण चित्र बदलणार का? कोण मारणार बाजी? वाचा

तसेच, भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल गांधी यांनी अनेक प्रसंगी म्हटले होते की, 'मी द्वेषाच्या बाजारात प्रेमाचे दुकान उघडण्यासाठी आलो आहे.' राहुल पुढे म्हणाले की, 'कर्नाटकातील जनतेला दिलेल्या पाच प्रमुख आश्वासनांवर सरकार स्थापन होताच काम सुरु होईल.'

त्याचवेळी, काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी यांनीही कर्नाटक निवडणुकीत पक्षाच्या विजयावर ट्विट केले आहे.

त्या म्हणाल्या की, 'काँग्रेस पक्षाला ऐतिहासिक जनादेश दिल्याबद्दल कर्नाटकातील जनतेचे मनापासून आभार. हा तुमच्या मुद्द्यांचा विजय आहे.

प्रगतीच्या विचाराला प्राधान्य देण्यासाठी कर्नाटकचा हा विजय आहे. देशाला जोडणाऱ्या राजकारणाचा हा विजय आहे.

कर्नाटक काँग्रेसच्या सर्व कष्टकरी कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना माझ्या हार्दिक शुभेच्छा. तुमच्या सर्व मेहनतीचे फळ मिळाले.

कर्नाटकातील जनतेला दिलेल्या हमीभावाची अंमलबजावणी करण्यासाठी काँग्रेस पक्ष तत्परतेने काम करेल. जय कर्नाटक, जय काँग्रेस.'

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com