Voting  Dainik Gomantak
गोवा

Goa Voter List Update: मतदारयादी सुधारणेसाठी गोव्यात विशेष मोहीम! मतदान केंद्रावर कोणकोणती कामे होणार जाणून घ्या

Goa State Election Commission: राज्यातील मतदारयादीत सुधारणा करण्यासाठी राज्य मुख्य मतदार अधिकारी कार्यालयाने विशेष मोहीम राबवण्याचे ठरवले आहे. या कालावधीत पत्त्यांत सुधारणा, यादीतील नावे कमी करणे, पत्त्यांत बदल, नवीन नावांचा समावेश करणे आदी कामे मतदान केंद्र पातळीवर केली जाणार.

गोमन्तक डिजिटल टीम

State Plans Special Drive to Improve Voter Registration

पणजी: राज्यातील मतदारयादीत सुधारणा करण्यासाठी राज्य मुख्य मतदार अधिकारी कार्यालयाने विशेष मोहीम राबवण्याचे ठरवले आहे. या कालावधीत पत्त्यांत सुधारणा, यादीतील नावे कमी करणे, पत्त्यांत बदल, नवीन नावांचा समावेश करणे आदी कामे मतदान केंद्र पातळीवर केली जाणार असल्याची माहिती संयुक्त मुख्य मतदार अधिकारी सुनील मसुरकर यांनी दिली.

त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, २० ऑगस्ट ते १८ ऑक्टोबरपर्यंत या यादीतील त्रुटी दूर करण्याचे काम कार्यालयीन पातळीवर करण्यात आले आहे. यादीचा कच्चा मसुदा आता तयार करण्यात आला आहे. तो प्रसिद्ध केला जाणार आहे. त्यानंतर या यादीतून कोणाची नावे गळाली असतील तर ती समाविष्ट करण्यासाठी, यादीतून मृत व्यक्तीची नावे काढण्यासाठी तसेच नवमतदारांची नावे समाविष्ट करण्यासाठी मतदान केंद्र पातळीवर मोहीम राबवण्यात येणार आहे.

गोवा

२९ ऑक्टोबर ते २८ नोव्हेंबरदरम्यान असे दावे सादर करता येणार आहेत. २४ डिसेंबरपर्यंत अशा दाव्यांवर निर्णय घेतला जाणार आहे. त्यानंतर ६ जानेवारी रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT