Amit Patkar Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: 'आगामी निवडणुकीत काँग्रेस सत्तेवर येणार'! पाटकरांचा दावा; ‘व्होट चोरी’ जागृतीतून जमवणार 4 कोटी सह्या

Vote Chori: ‘व्होट चोरी’ जनजागृती अंतर्गत राज्यातही सह्यांचे निवेदन निवडणूक आयोगाला सादर करणार आहोत, अशी माहिती कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी दिली.

गोमन्तक डिजिटल टीम

मोरजी/पेडणे: भाजपकडून‘व्होट चोरी’ कशी केली जाते. याची सविस्तर माहिती खासदार तथा काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी लोकसभेत दाखवून दिली आहे. त्याच अनुषंगाने ‘व्होट चोरी’ जनजागृती अंतर्गत सह्यांच्या मोहिमेद्वारे देशभरातून ४ कोटी सह्या जमवणार असून राज्यातही सह्यांचे निवेदन निवडणूक आयोगाला सादर करणार आहोत, अशी माहिती कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी दिली.

पार्से पंचायत क्षेत्रातील रहिवाशांकडे संपर्क साधून ‘व्होट चोरी’बाबत घरोघरी जनजागृती केली. यावेळी गोवा प्रदेश काँग्रेस सदस्य बाबी बागकर, मांद्रे गटाध्यक्ष नारायण रेडकर, प्रदीप प्रभुदेसाई, काँग्रेसचे प्रवक्ते देवेंद्र प्रभु देसाई, उत्तर गोवा अध्यक्ष वीरेंद्र शिरोडकर, प्रणव परब, बेलेरिअन फर्नांडिस, प्रदीप सावंत , मिंगेल फर्नांडिस आदी उपस्थित होते.

पाटकर यांनी पुढे माहिती देताना सांगितले की राज्यात चाळीसही मतदार संघात ही मोहीम झाली. असून मांद्रे मतदारसंघात प्रतिसाद मिळत आहे.

काँग्रेस सत्तेवर येणार!

गोवा प्रदेश काँग्रेस अध्यक्ष अमित पाटकर यांनी विश्वास व्यक्त करताना आगामी विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेस पक्ष सत्तेवर येणार आहे. काँग्रेसचा विजय होण्यासाठी सध्या भाजपकडून चोरीचे मतदान होत आहे. हे थांबवून त्यांची लक्तरे वेशीवर टांगली पाहिजेत, त्यासाठी ही मोहीम आहे, असे पाटकर यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Surya Ketu Yuti 2026: सूर्याचं राशी परिवर्तन अन् केतुचा महासंगम! 'या' राशींना लागणार जॅकपॉट; बँक बॅलन्समध्ये होणार मोठी वाढ

VIDEO: 'मला नरेंद्र नावाचा तिरस्कार...', भारतीय बॉक्सरनं सांगितला पाकिस्तानी खेळाडूचा किस्सा; PM मोदीही हसून-हसून लोटपोट

संसदेत राडा! महिला खासदारानं पंतप्रधानांवर फेकली अंडी; म्हणाली, "तुम्हाला लाज वाटली पाहिजे..." Watch Video

Cricket Fight: LIVE सामन्यात हायव्होल्टेज ड्रामा! विजयी शॉटनंतर बॅट घेऊन प्रतिस्पर्ध्यावर धावला फलंदाज; इतर खेळाडू नसते तर... व्हिडिओ व्हायरल

Lucky Zodiac Signs 2026: कामाचा ताण अन् नव्या जबाबदाऱ्यांचं आव्हान! ऑगस्ट महिन्यात 'या' राशीचं नशीब घेणार वळण; मेहनतीचं फळ लगेच मिळणार नाही

SCROLL FOR NEXT