श्री मल्लिकार्जुन देवस्थान Dainik Gomantak
गोवा

काणकोण येथील मल्लिकार्जुन देवस्थानच्या अध्यक्षपदी विठोबा देसाई यांची निवड

अटीतटीची लढत: 14 देवस्थान समित्यांच्या निवडणुका शांततेत

दैनिक गोमन्तक

आगोंद: श्री मल्लिकार्जुन देवस्थान श्रीस्थळ, काणकोण देवस्थानच्या समितीची निवड दि.13 रोजी काशी पुरुष सभागृहात श्रीस्थळ येथे पार पडली. अध्यक्षपदाच्या अटीतटीच्या लढतीत निवृत्त मुख्याध्यापक विठोबा म. देसाई यांच्या यांनी आपल्या प्रतिस्पर्धी उमेदवारावर तीस मतांनी विजय प्राप्त केला.सचिव पदी राजेंद्र भगत, खजिनदार सचिन देसाई, मुख्यात्यार- प्रमोद देसाई यांची निवड झाली आहे.

श्री मल्लिकार्जुन देवस्थानात झालेली देवस्थान समितीची निवडणूक अतिशय शिस्तबद्ध व शांततापूर्ण वातावरणात झाली. मतमोजणीत आधी अध्यक्षपदाचे उमेदवार विठोबा म. देसाई यांनी प्रतिस्पर्धी उमेदवाराविरुद्ध 80 मतांची आघाडी घेतली होती. यंदाच्या शिगमोत्सव व कौलोत्सवाला काणकोण तालुक्यात बुधवार दि.9 आजपासून सुरुवात झाली आहे.

गावडोंगरी, खोतीगाव व श्रीस्थळ काणकोण येथील श्री मल्लिकार्जुन देवस्थान समितीतर्फे दिनांक 13 मार्च रोजी होणारी देवस्थान समितीची निवडणूक पुढे ढकलण्यात यावी, तसे रितसर निवेदन सादर केले होते.

दरम्यान, श्रीस्थळ येथील श्री मल्लिकार्जुन देवाचा अवतार पुरुषाच्या अवतार व कौलोत्सवाला 9 मार्चपासून सुरुवात झाली आहे. दि.12 व 13 मार्च रोजी, पाटणे तसेच भगतवाडा दि.13 व 14 मार्च अशा दोन ठिकाणी अवतार झाला. शिवाय तळया देण्याचा कार्यक्रम सुद्धा आहे. श्रीस्थळच्या श्री मल्लिकार्जुन देवाचे सर्व महाजन या उत्सवाशी संबंधित असल्यामुळे दि.13 मार्च ऐवजी 20 मार्च रोजी या निवडणुका घेण्यात याव्यात, जसा फोंडा तालुक्यातील एका देवस्थानच्या बाबतीत निर्णय झालेला आहे. तसाच न्याय याठिकाणी देण्यात यावा, असा प्रस्ताव देवस्थान समितीचे अध्यक्ष राजेंद्र देसाई यांनी दिलेला होता.

तिघांची निवड बिनविरोध

काणकोणातील 14 देवस्थानच्या निवडणुका शांततापूर्ण वातावरणात पार पडल्या,अशी माहिती काणकोणचे मामलेदार मनोज कोरगावकर यांनी दिली. यापैकी पाटणे येथील विनय म.देसाई- (उपमुख्यत्यार) भिकरवाडा येथील धनंजय अभी देसाई-(उप खजिनदार), तसेच भगतवाडा येथील सम्राट भगत, या तिघांची बिनविरोध निवड झाली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT