कळंगुटच्या उप-सरपंचपदी शेरॉल लोबोंची बिनविरोध निवड

पंचायत कार्यालयात झालेल्या गुप्त बैठकीत माजी सरपंच फ्रांन्सिस्को रॉड्रीगीश (Francisco Rodriguez) यांनी उप-सरपंच पदासाठी शेरॉल लोबो यांचे नांव सुचविले त्याला पुजा मठकर यांनी अनुमोदन दिले.
 Deputy Sarpanch Sheryl Lobo
Deputy Sarpanch Sheryl LoboDainik Gomantak
Published on
Updated on

कळंगुट पंचायतीच्या (Calangut Panchayat) उप-सरपंचपदी शेरॉल लोबो
(Sheryl Lobo) यांची आज एकमताने निवड करण्यात आली. यापुर्वीच्या उप-सरपंच पुजा मठकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर हे पद रिक्त झाले होते. दरम्यान, बुधवारी सकाळी पंचायत कार्यालयात झालेल्या गुप्त बैठकीत माजी सरपंच फ्रांन्सिस्को रॉड्रीगीश यांनी उप-सरपंच पदासाठी शेरॉल लोबो यांचे नांव सुचविले त्याला पुजा मठकर यांनी अनुमोदन दिले.बार्देश गटविकास कार्यालयातील अधिकारी सुशांत शेट्ये (Sushant Shetty) यांनी निरीक्षक म्हणून काम पाहतांना शेरॉल लोबो यांची कळंगुठच्या उप-सरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आल्याचे घोषीत केले.

 Deputy Sarpanch Sheryl Lobo
Goa: कळंगुट बीच पर्यटकांनी फुलला

दरम्यान, कळंगुट पंचायतीच्या एकुण अकरा सदस्यांपैकी विद्यमान सरपंच शॉन मार्टीन्स यांच्या सहित एकुण सात पंच सदस्य यावेळी उपस्थित होते तर  ज्योत्स्ना परुळेकर (Jyotsna Parulekar), गाब्रीयल फर्नांडिस, सुदेश मयेंकर तसेच रुपा चंद्रकांत चोडणकर यावेळी अनुपस्थित होत्या. दरम्यान, कळंगुट जिल्हा पंचायतीचे सदस्य दत्तप्रसाद दाभोलकर (Dattaprasad Dabholkar) यावेळी आवर्जून उपस्थित होते. अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात ही बैठक पार पडल्याचे सरपंच शॉन मार्टीन्स यांनी दै. गोमंतकशी बोलतांना सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com