Vistara Airline  Dainik Gomantak
गोवा

Vistara Airline : गोव्यात येणाऱ्या प्रवाशांसाठी खुशखबर; व्हॅलेंटाईन डे दिवशी विस्तारा देणार मोठं गिफ्ट

गोव्यातील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळाचे अलीकडेच उद्घाटन करण्यात आले आहे

Rajat Sawant

विस्तारा एअरलाइन्सने मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळाला आपल्या देशांतर्गत नेटवर्कमध्ये समाविष्ट करण्याची घोषणा केली आहे. विस्तारा एअरलाइन्स मुंबई व बंगळूरु विमानतळ ते मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ या ठिकाणी विमानसेवा सुरू करणार आहे. 14 फेब्रुवारीपासून विमानसेवा सुरू होणार आहे.

मुंबई ते मोपा अशी आठवड्याला ६ विमाने मोपावर उतरणार आहेत तर बंगळूरु ते मोपा या मार्गावर दररोज उड्डाणे चालवली जाणार असल्याची माहिती विस्‍ताराच्या अधिकाऱ्यांनी दिली. विस्‍तारा एअरलाइन्स या मार्गावर A320neo विमानाचा वापर करणार आहे. या विमानातील बैठक व्यवस्था तीन क्लास मध्ये विभागली आहे.

विस्ताराचे सीईओ विनोद कन्नन यांनी याबाबत अधिक माहिती दिली, ते म्हणाले “गोव्यातील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळाचे अलीकडेच उद्घाटन करण्यात आले आहे. आम्ही मुंबई आणि बंगळुरू येथून भारतातील आणि जगभरातील पर्यटकांच्या पसंतीच्या शहरात अतिरिक्त उड्डाणे जाहीर करण्यास उत्सुक आहोत".

"आमच्या ग्राहकांना उत्तम कनेक्टिव्हिटी आणि सुविधा देण्याचे आमचे उद्दिष्ट आहे कारण ते भारतातील सर्वात प्रिय एअरलाइन्सने उड्डाण करतात. आम्हाला आशा आहे की ग्राहक या मार्गांवर आमच्या पुरस्कार विजेत्या उत्पादनांचे आणि सेवांचे कौतुक करतील.”

काही दिवसांपूर्वी अकसा आणि विस्तारा या एअरलाइन्सने विमानाच्या उड्डाणासाठी आवश्यक कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यास सुरु केले होते. दरम्यान, विस्तारा एअरलाइन्स आता 14 फेब्रुवारीपासून मुंबई व बंगळूरु विमानतळ ते मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ या ठिकाणी विमानसेवा सुरू करणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT