Goa Dainik Gomantak
गोवा

Goa News : कर्नाटकातील खानापूरमधील ऐतिहासिक स्थळांना भेट; ४० जणांचा सहभाग

Goa News : संत सोहिरोबानाथ आंबिये, पीईएस महाविद्यालयाचा पुढाकार

गोमन्तक डिजिटल टीम

Goa News :

पर्वरी, संत सोहिरोबानाथ आंबिये कला आणि वाणिज्य शासकीय महाविद्यालय, विर्नोडा व पीईएस महाविद्यालय फर्मागुढी-फोंडा येथील इतिहास विभागातर्फे कर्नाटकातील खानापूर येथे इतिहास सहलीचे आयोजन करण्यात आले होते.

या इतिहास सहलीत गोव्यातील सात महाविद्यालयांतील एकूण ४० विद्यार्थी व प्राध्यापकांनी सहभाग नोंदवला.

धेंपे कला व विज्ञान महाविद्यालय, मिरामार, मल्लिकार्जुन महाविद्यालय काणकोण, व्ही.एम. साळगावकर कायदा महाविद्यालय, मिरामार, कला, विज्ञान व वाणिज्य शासकीय महाविद्यालय साखळी, पीईएस महाविद्यालय फर्मागुढी, विद्याप्रबोधिनी महाविद्यालय व संत सोहिरोबानाथ आंबिये कला व वाणिज्य शासकीय महाविद्यालय विर्नोडा आदी महाविद्यालयांतील विद्यार्थी व प्राध्यापकांनी या शैक्षणिक सहलीत सहभाग नोंदवला. संत सोहिरोबानाथ आंबिये कला व वाणिज्य शासकीय महाविद्यालय, विर्नोडा येथील इतिहास विभागातील प्राध्यापक डॉ. रोहित फळगावकर यांनी मार्गदर्शन केले.

हलशी येथील पुरातत्व स्थळांची पाहणी

या सहलीचा मुख्य उद्देश हा हलशी, देगाव आणि देगोहल्ली येथील पुरातत्व स्थळांची पाहणी करणे हा होता. ही स्थळे गोवा कदंब घराण्याच्या राज्याचा एक भाग होती. ज्यांची राजधानी हळशी होती. हळशी येथील श्री भुवराह नृसिह मंदिर, सुवर्णेश्वर मंदिर, कल्लमेश्वर मंदिर आदी मंदिरांची पाहणी विद्यार्थी आणि कर्मचारी यांच्याकडून करण्यात आली.

या सहलीमुळे गोमंतकातील विद्यार्थी आणि इतिहासप्रेमींना पुरातत्त्व स्थळांची ओळख झालीच याशिवाय त्यांच्यातील ऐतिहासिक जाणीव समृद्घ झाली. गोमंतकीय कदंब राजवटीच्या समृद्घ आणि ऐतिहासिक स्थळांची ओळख नव्या पिढीला होणे ही काळाची गरज आहे.

-डॉ. रोहित फळगावकर, इतिहास विभाग, संत सोहिरोबानाथ आंबिये महाविद्यालय, विर्नोडा

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

PM Kisan 24th Installment: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट? पीएम किसानचा 24वा हप्ता 'या' दिवशी जमा होणार; पाहा काय आहे अपडेट

VIDEO: समुद्रात तरंगू लागले आयफोन अन् लक्झरी परफ्यूमचे बॉक्सेस! होर्मुझ सामुद्रधुनीत भीषण अपघात; जहाजावरील 21 जणांचा जीव थोडक्यात वाचला

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

Goa Ranji Trophy 2026: बडोद्याकडून पराभवाचा झटका; मोहित रेडकर, दीपराज गावकर यांना गोव्याच्या रणजी संघातून डच्चू!

SCROLL FOR NEXT