Canacona Water Crisis Dainik Gomantak
गोवा

Canacona Water Crisis: काणकोणकरांच्या नशिबी पिण्यायोग्य पाणीही नाही! ‘प्रोग्रेसिव्ह काणकोण’चा दावा; स्वच्छ पाण्यासाठी 15 सूचना

Canacona Water Crisis: आगोंद आणि खोला भागात पुरवले जाणारे पाच ठिकाणचे पाणी मानवी वापरायोग्य नसल्याचा अहवाल, काणकोण आरोग्य अधिकाऱ्यांनी दिला होता.

गोमन्तक डिजिटल टीम

आगोंद आणि खोला भागात पुरवले जाणारे पाच ठिकाणचे पाणी मानवी वापरायोग्य नसल्याचा अहवाल, काणकोण आरोग्य अधिकाऱ्यांनी दिला होता. या पार्श्‍वभूमीवर काणकोणातील जनतेच्या नशिबी पिण्यायोग्य पाणीच नाही,असा दावा करून या समस्येवर सरकारने गांभीर्याने लक्ष द्यावे, तसेच स्वच्छ पाणीपुरवठ्यासाठी ‘मास्टर प्लॅन’अंतर्गत १५ सूचना त्वरित लागू कराव्यात, अशी मागणी व्हीजन आणि मिशन प्रोग्रेसिव्ह काणकोणतर्फे जनार्दन भंडारी यांनी केली आहे.

सार्वजनिक बांधकाम खात्याचे वरीष्ठ अभियंते उत्तम पार्सेकर आणि इतर विविध प्राधिकरणांना निवेदन सादर केल्यानंतर भंडारी बोलत होते. काणकोण येथील जल संकटाचा सखोल अभ्यास करून तयार केलेल्या मास्टर प्लॅनवर लक्ष ठेवून आहोत,असेही ते म्हणाले.

आगोंद आणि खोला येथील ‘साबांखा’च्या पाणीपुरवठा विभागाकडून पुरवले जाणारे ५ ठिकाणचे पाणी मानवी वापरासाठी सुचवले जाऊ शकत नाही, असे काणकोण आरोग्य अधिकाऱ्यांनी घोषित केलेल्या ताज्या अहवालाने काणकोणमधील जलसंकटाची सध्याची स्थिती उघड केली आहे. पंतप्रधानांनी ऑगस्ट, २०२२ मध्ये गोवा सरकारचे ''हर घर जल-प्रमाणित'' पहिले राज्य म्हणून अभिनंदन केले होते. म्हणजेच राज्यातील प्रत्येक घरात नळाद्वारे पाणी मिळते. परंतु वास्तव निराळे आहे आणि काणकोणकरांना समस्यांना सामोरे जावे लागत आहे. पिण्यायोग्य पाणीपुरवठ्याची कमतरता आणि जे काही पाणी आपल्याला मिळत आहे, ते स्वच्छ आणि आरोग्यदायीदेखील नाही.

निवेदनातील सूचना

काणकोण येथील सार्वजनिक पाणीपुरवठा व्यवस्था सुरळीत करण्यासाठी १५ सूचना निवेदनात केल्या आहेत. त्यात चापोली धरण, गावणे धरण, जलशुद्धीकरण केंद्रातील फिल्टर, पाण्याच्या टाक्या, पाण्याच्या टाकीची देखभाल, बॅकअप वॉटर पंपची तरतूद, सुरक्षितता व सुरक्षा, आवश्यक मनुष्यबळ भरती, पाण्याचे टँकर, विभागीय वाहनाची उपलब्धतता यासंबंधीच्या आहेत.

मुख्यमंत्र्यांना साकडे

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी प्रधान मुख्य अभियंता, मुख्य अभियंता-पाणी पुरवठा आणि काणकोणमधील सार्वजनिक पाणीपुरवठ्यासाठी जबाबदार असलेल्या इतर उच्च दर्जाच्या अधिकाऱ्यांना पाणीप्रश्‍नी लक्ष घालण्याचे निर्देश द्यावेत. पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी वरील सर्व बंधारे, पाण्याचे संयंत्र यांची संयुक्त पाहणी करावी.

दूषित पाणी; वाढते आजार, वाढते रूग्ण

काणकोण येथील अस्वच्छ पाणीपुरवठा, पाण्याचे संकट हा प्रश्न अनेक वर्षांपासून मांडत आहोत आणि पाण्याचा हा गंभीर प्रश्न सोडवण्यासाठी अनेक निवेदने (परिशिष्ट-ए) विविध सरकारी अधिकाऱ्यांना सादर केली आहेत, परंतु आजतागायत यात कोणतीही सुधारणा झालेली नाही. दूषित पाणीपुरवठ्यामुळे काणकोणात विविध आजारांचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. काणकोण तालुक्यात मूत्रपिंडाच्या तीव्र आजाराने ग्रस्त रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. आता काणकोणामध्ये स्तन कर्करोग, त्वचारोग आणि इतर गंभीर त्वचेशी संबंधित आजाराने ग्रस्त रुग्ण आढळून आले आहेत, ही खरोखरच एक गंभीर चिंतेची बाब आहे

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's News Live: सायबर क्राईम रोखण्यासाठी गोवा पोलिस अलर्ट, 152 मोबईल नंबर केले ब्लॉक

Goa Crime: दोन सह्या करुन विवाह उरकला, काही दिवसातच नवदेवाने विचार बदलला; लैंगिक अत्याचारप्रकरणी फोंड्यातील तरुणाला अटक

IFFI 2024 मध्ये लोकसंस्कृतीद्वारे देशाची एकता, अखंडतेचे दर्शन! दवर्लीत होणार खुले फिल्म स्क्रिनिंग

Nithya Menen At IFFI: 'तरीही त्या व्यक्तीसोबत काम करणे कर्तव्यच'; अभिनेत्री नित्या मेनन सहकलाकारांबद्दल नेमके काय म्हणाली..

IFFI 2024: ‘ट्रेन’ संकल्पनेतून भारतीय सिनेमाची ‘सफर’! कॅमेऱ्याच्या प्रवेशद्वाराचे विशेष आकर्षण

SCROLL FOR NEXT