Vishwajit Rane  Dainik Gomantak
गोवा

समाजमंदिरातून सर्वांगीण विकासाला चालना: विश्‍वजित राणे

खोतोडा येथे समाजमंदिराचा लोकार्पण सोहळा

दैनिक गोमन्तक

पिसुर्ले: ग्रामीण भागाच्या विकासासाठी अनेक प्रकारच्या सुविधा निर्माण करणे आवश्यक असते. याकरिता राजकीय नेते यशस्वी होण्याची गरज असते. अनेक क्षेत्रामध्ये अनेक स्वरूपाच्या सुविधा निर्माण झालेल्या आहेत. मात्र उर्वरित सुविधा निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून प्राधान्य देण्यात येणार असल्याचे आश्वासन आरोग्यमंत्री तथा नगरनियोजन मंत्री विश्‍वजित राणे यांनी केले आहे.

खोतोडा पंचायत क्षेत्रातील खोतोडा या ठिकाणी उभारण्यात आलेल्या समाजमंदिर उद्‍घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी मतदार जाहीर आभार प्रदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

यावेळी राणे म्हणाले, सार्वजनिक विकास ही सातत्याने पुढे जाणारी प्रक्रिया असते. मात्र ठिकठिकाणी निर्माण झालेल्या गैरसोयी व समस्या यांचे निवारण करण्याचे काम प्राधान्याने केले पाहिजे त्यावर आपण भर देणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.

यावेळी व्यासपीठावर सामाजिक कार्यकर्ते विनोद शिंदे, खोतोडा सरपंच संतोष गावकर, नगरगाव जि.प. राजश्री काळे, पंच सभासद राजेश पर्येकर, भारत नाईक, प्रतिक्षा च्यारी, माजी पंचायत सभासद प्रेमनाथ दळवी, सचिव- विनायक सावंत आदी उपस्थित होते. सुत्रसंचालन सच्चित म्हाऊसकर तर रुपेश गावकर यांनी आभार मानले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cooch Behar Trophy: लाखमोलाची आघाडी! बंगालविरुद्ध अनिर्णित लढत; गोव्याच्या U-19 संघाने पहिल्या डावातील 27 धावांच्या जोरावर गाठली बाद फेरी

Goa Advocate General: बेकायदेशीर कामांमध्ये गोमंतकीयांचाही हात, असं का म्हणाले अॅडव्होकेट जनरल देविदास पांगम?

Arpora Nightclub Fire Case: ...म्हणून लुथरा बंधूं देशाबाहेर पळाले, हडफडे दुर्घटनाप्रकरणी सरकारी यंत्रणांची मोठी चूक

South Goa Hotel Inspection: हडफडेच्या आगीचा धसका! दक्षिण गोव्यातील 15 हॉटेल्स-पब्जकडे NOC चं नाही, तपासणीत मोठा खुलासा

Goa Rent-a-Car: 'निर्णय मागे घ्या' नाहीतर...! रेन्ट अ कार व्यावसायिकांची पणजीत धडक; वाहतूक खात्याचा परवाना निर्णयाविरुद्ध संताप

SCROLL FOR NEXT