Vishwajit Rane on Dengue
Vishwajit Rane on Dengue Dainik Gomantak
गोवा

Vishwajit Rane : राज्यात डेंग्यूच्या वाढत्या रुग्णांमुळे धास्ती

आदित्य जोशी

पणजी : राज्यात सध्या डेंग्यूच्या साथीने थैमान घातलं आहे. राज्यात ठिकठिकाणी लोकांमध्ये डेंग्यूची लक्षणे दिसू लागल्याने रुग्णालयांमध्येही गर्दी दिसू लागली आहे. आता गोव्याचे आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी अधिकृतरित्या डेंग्यूच्या रुग्णांची आकडेवारी सादर केली आहे. राज्यात डेंग्यूचे 102 रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे प्रशासकीय स्तरावर उपाययोजना आखल्या जात असल्याचंही राणेंनी म्हटलं आहे.

गोवा विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान प्रश्नाला उत्तर देताना विश्वजीत राणे यांनी आतापर्यंत गोव्यात डेंग्यूचे 102 रुग्ण सापडले आहेत. राज्यातील डेंग्यू नियंत्रणात आणण्यासाठी आरोग्य खातं, पंचायत आणि नगरविकास खातं मिळून काम करत असल्याचंही विश्वजीत राणे यांनी स्पष्ट केलं. सध्या डेंग्यूची साथ गोव्यासाठी डोकेदुखी ठरत असतानाच आरोग्य मंत्र्यांनी प्रतिबंधात्मक पावलं उचलत असल्याचं स्पष्ट केलं आहे.

दरम्यान राज्यातील डेंग्यू नियंत्रणात आणण्यासाठी धूर फवारणी महत्त्वाची आहे. त्यामुळे ग्रामीण आरोग्य केंद्रांना आरोग्य खात्याने कर्मचारी पुरवावेत, अशी मागणी गोवा फॉरवर्डचे सर्वेसर्वा आणि फातोर्ड्याचे आमदार विजय सरदेसाई आणि मडगावचे आमदार दिगंबर कामत यांनी केली आहे. तसंच नगरपालिका कर्मचाऱ्यांवर लोकांचा विश्वास राहिला नसल्याचा टोलाही त्यांनी लगावला आहे. डेंग्यूच्या वाढत्या साथीमुळे विधानसभेत वातावरण तापलेलं पाहायला मिळालं आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024: सोशल मीडियावरही ‘व्होटिंग फिव्हर’; राज्यातील तरुणाईने साजरा लोकशाहीचा उत्सव

Lok Sabha Election 2024: ''वाढीव टक्का, भाजपचा विजय पक्का''; काँग्रेसच्या गोटात चिंतेचे वातावरण

Goa Final Vote Turnout: गोव्यात 75.20 टक्के मतदान

Goa Today's Top News: लोकसभा मतदानाला उत्सफूर्त प्रतिसाद, आता नजर निकालाकडे; गोव्यातील ठळक बातम्या

Panaji: भूक लागलीय, भजी कोठे मिळतील? केस काळे केले म्हणून कोणी 'भाऊ' होत नाही; पणजीतील मतदाराचा नाईकांवर रोष

SCROLL FOR NEXT