Vishwajit Rane Dainik Gomantak
गोवा

विषाणू ‘म्युटेड’ होऊ शकतो, लस घेणं हाच पर्याय

आरोग्यमंत्री विश्‍वजीत राणेंचं आवाहन; 60 वर्षांवरील नागरिकांचे बुस्टर डोस घेण्याचे प्रमाण कमी

दैनिक गोमन्तक

पणजी : सध्या राज्यात सक्रिय रुग्णांची संख्या 376 झाली आहे. केरळ, दिल्ली, महाराष्ट्रापाठोपाठ गोव्याचा नंबर लागत असल्याने नागरिकांनी सतर्क होणे अत्यंत गरजेचे आहे. अशा स्थितीत विषाणू म्युटेड म्हणजे बदलूदेखील शकतो. कदाचित तो सध्याच्या स्थितीपेक्षा त्रासदायकही असू शकतो. त्यामुळे बुस्टर डोससाठी पात्र नागरिकांनी आणि 12 वर्षांवरील मुलांनी लस घ्यावी असे आवाहन आरोग्यमंत्री विश्‍वजीत राणे यांनी केले.

राज्यात वाढत असलेल्या कोरोनाबाधितांचे प्रमाण लक्षात घेऊन आरोग्य प्रशासनाने कोरोनासंबंधीची तज्ज्ञ समितीची बैठक काल बुधवारी घेतली. यावेळी गोवा वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्‍णालयाचे डीन डॉ. शिवानंद बांदेकर, आरोग्य संचालक डॉ. गिता काकोडकर, लसीकरण प्रमुख डॉ. राजेंद्र बोरकर, साथरोग विभाग प्रमुख डॉ. उत्कर्ष बेतोडकर यांच्यासह वैद्यकीय क्षेत्रातील अनेक तज्ज्ञ डॉक्टर उपस्थित होते. सर्वांनुमते लसीकरणावर भर देण्यासाठी विशेष प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.

कोरोना सक्रिय रुग्णांची संख्या 376, 77 नवे बाधित 26 बरे

राज्यात बुधवारी कोरोनाचे नवे तब्बल 77 रुग्ण सापडले असून संक्रमणाचा दर 8.02 टक्के इतका झाला आहे. तर सक्रिय रुग्णांची संख्या 376 झाली आहे. राज्यात आतापर्यंत 2 लाख 46 हजार 192 नागरिकांना कोरोनाची बाधा झाली असून यापैकी 2 लाख 41 हजार 984 रुग्ण बरे झाले. हे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.29 टक्के इतके आहे. काल दिवसभर 960 संशयित रुग्णांच्या चाचण्या घेण्यात आल्या.

बुस्टर डोसकडे लोकांचे दुर्लक्ष

60 वर्षांवरील सर्व नागरिक, विविध रोगांनी ग्रस्त रूग्ण, फ्रंटलाईन वर्कर, आरोग्य कर्मचाऱ्यांची राज्यात 1 लाख 24 हजार 362 संख्या आहे. पण केवळ 58 हजार 862 जणांनी बूस्टर डोस घेतला. अजुनही 65 हजार 500 जण डोसविना आहेत. हे गंभीर असून विषाणूत बदल झाल्यास संभाव्य धोका वाढू शकतो. वाईट घटना घडल्यानंतरच लोक शहाणे होतात, हे बदलले पाहिजे. तेव्हा पात्र नागरिकांनी त्वरित डोस घेण्याचे आवाहन राणे यांनी केले.

बाल रुग्णालयात डोसची सोय

प्रशासनाचे लक्ष आता लहान मुले असून 12 ते 18 वयोगटातील सर्व मुलांना लस देण्याचा उद्देश आहे. यासाठीच राज्य सरकारने राज्यातील बाल रुग्णालयातही कोरोना डोसची सोय केली आहे. रुग्णांच्या संमतीने हा डोस दिला जाणार आहे. राज्य सरकारच्या या निर्णयाचा बालरोग तज्ज्ञ असोसिएशनने स्वागत केल्याचे डॉ. धनेश वळवईकर यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

PM Kisan 24th Installment: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट? पीएम किसानचा 24वा हप्ता 'या' दिवशी जमा होणार; पाहा काय आहे अपडेट

VIDEO: समुद्रात तरंगू लागले आयफोन अन् लक्झरी परफ्यूमचे बॉक्सेस! होर्मुझ सामुद्रधुनीत भीषण अपघात; जहाजावरील 21 जणांचा जीव थोडक्यात वाचला

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

Goa Ranji Trophy 2026: बडोद्याकडून पराभवाचा झटका; मोहित रेडकर, दीपराज गावकर यांना गोव्याच्या रणजी संघातून डच्चू!

SCROLL FOR NEXT