Pernem Dainik Gomantak
गोवा

Pernem: 'आंबिये'च्‍या विद्यार्थ्यांनी गिरवले पुरण शेतीचे धडे, पारंपरिक भातशेतीचा घेतला प्रत्यक्ष अनुभव

Puran Sheti Traditional Farming Goa: सत्तरी तालुक्यातील शिर-सावर्डे आणि धावे-तार परिसरात ‘पुरण शेती’ या पारंपरिक भातशेती पद्धतीचा अभ्यास करण्यासाठी एकदिवसीय भेट आयोजित करण्यात आली.

गोमंतक ऑनलाईन टीम

पेडणे: विर्नोडा-पेडणे येथील संत सोहिरोबानाथ आंबिये शासकीय महाविद्यालय व संशोधन केंद्राच्‍या भूगोल तसेच कोकणी विभागाच्या संयुक्त विद्यमाने सत्तरी तालुक्यातील शिर-सावर्डे आणि धावे-तार परिसरात ‘पुरण शेती’ या पारंपरिक भातशेती पद्धतीचा अभ्यास करण्यासाठी एकदिवसीय भेट आयोजित करण्यात आली.

या भेटीमागील उद्दिष्ट विद्यार्थ्यांना पारंपरिक भातशेतीशी संबंधित भौगोलिक व पर्यावरणीय घटकांचा अभ्यास करून प्रत्यक्ष अनुभव देणे, तसेच भाषा, संस्कृती आणि शेती पद्धती यांतील परस्परसंबंध समजून घेणे हे होते. याचबरोबर स्थानिक समाजात वापरल्या जाणाऱ्या पारंपरिक कोकणी शेतीसंबंधित संज्ञांचे दस्तऐवजीकरण करण्यावरही भर देण्यात आला.

या उपक्रमात बी.ए., बी.कॉम. आणि बी.एस्सी. (ग्रीन एनर्जी सिस्टिम्स) या शाखांतील भूगोल व कोकणी विभागाचे विद्यार्थी सहभागी झाले होते. या उपक्रमाचे आयोजन प्राचार्य जुवांव कॉस्टा यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा. प्रियांका परब, डॉ. जयप्रभू कांबळे आणि प्रा. सपना वरक यांनी केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Professional League 2026: स्पोर्टिंग क्लब द गोवाचा 'विराट' विजय! डॉयल अल्विसची शानदार हॅटट्रिक अन् प्रोफेशनल लीगच्या जेतेपदावर तिसऱ्यांदा कोरलं नाव

Goa River Drowning Cases: गोव्यात बेफिकिरीमुळेच बुडण्याच्या घटनांमध्‍ये होतेय वाढ! सत्तरी तालुक्‍यातही चिंता; मद्यसेवन, सुरक्षेअभावी नद्या बनल्‍या धोकादायक

Harmal Wedding Theft : वीज पुरवठा थांबवून मारला डल्ला, लग्नसोहळ्यातील लुटीचा पडद्याआडून खेळ तपासाचे आव्हान

Bicholim Class 11 Admissions : अकरावीच्या प्रवेशासाठी धावपळ, विज्ञान शाखेसाठी चुरस; ‘ऑनलाईन’ प्रवेश प्रक्रिया सुरू

Goa Kala Academy : कला अकादमीला आता तरी जाग येणार का?

SCROLL FOR NEXT