Viriato Fernandes Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: कोळसा नको म्हणणारा आमदार झाला ‘एजंट’! विरियतो फर्नांडिसांचा आरोप; विरोध चालूच राहणार असल्याचे स्पष्टीकरण

Viriato Fernandes: खासदार निधीतून सडा येथील रोझ सर्कल मैदानाचा विकास करण्यात यावा अशी मागणी खासदार फर्नांडिस यांच्याकडे करण्यात आली होती.

Sameer Panditrao

वास्को: गोव्याला कोळशाचा काहीच फायदा नसल्याने कोळसा आम्हाला नकोच आहे. यापूर्वी येथे कोळसा नको म्हणणारा व इकडून तिकडे उडी मारणारा आमदार आता त्या कोळसा एजंटाचा एक भाग झाल्याचा दावा दक्षिण गोव्याचे खासदार कॅप्टन विरियतो फर्नांडिस यांनी सोमवारी येथे केला. त्या आमदाराने कोळसा प्रदूषणाच्या बाबतीत लोकांचा घात केला आहे. मात्र, कोळसाविरोधात आमचा लढा चालूच राहणार असल्याचे फर्नांडिस यांनी स्पष्ट केले.

खासदार निधीतून सडा येथील रोझ सर्कल मैदानाचा विकास करण्यात यावा अशी मागणी खासदार फर्नांडिस यांच्याकडे करण्यात आली होती. त्यासंबंधी त्या मैदानाची पाहणी करण्यासाठी ते सडा भागात आले होते. त्या मैदानाचा विकास करण्यासाठी क्रीडा व युवा व्यवहार संचालनालयाने ना हरकत दाखला दिला आहे.

Khari Kujbuj Political Satire

पाहणी अगोदर त्यांनी लक्ष्मीनारायण इस्वटी ब्राह्मण देवस्थानला भेट देऊन दर्शन घेतले. तेथे देवस्थान समितीचे अध्यक्ष प्रेमानंद केरकर यांनी त्यांचे स्वागत केले. याप्रसंगी काँग्रेसचे ओबीसी विभागाचे अध्यक्ष शरद चोपडेकर, जिल्हा अध्यक्ष सावियो डिसोझा, मुरगाव गट अध्यक्ष साईश अमेरकर, महिला अध्यक्ष विनिका आरोलकर, राजू यादव उपस्थित होते.

मुरगावातील धक्क्यांच्या खासगीकरणाचा डाव

फर्नांडिस यांनी मुरगाव बंदर प्राधिकरणालाही लक्ष्य केले. लोह खजिन येथून निर्यात करण्यात येत होते. तेव्हा मुरगाव बंदर नफ्यामध्ये होते. अचानकपणे तोट्यात जाण्यामागे काही डाव असला पाहिजे. एमपीटी तोट्यात चालल्याचे दाखवून मुरगाव बंदरातील विविध धक्क्यांचे खासगीकरण करण्याचा डाव पूर्वीच शिजला होता. त्यामुळे आता मुरगाव बंदरातील धक्क्यांचे खासगीकरण करण्यात येत असल्याचा दावा त्यांनी केला. त्यांनी मुरगाव बंदर प्राधिकरणाच्या अध्यक्षांनाही लक्ष्य केले. त्यांना बंदर कामकाजाचे ज्ञान नाही. मुरगाव बंदरातील अदानी कंपनीकडे मोठी थकबाकी असताना ती वसुल का करण्यात येत नाही. यासंबंधी चौकशी झाली पाहिजे, असे त्यांनी म्हटले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India vs Pakistan: ये तो ट्रेलर था, पिक्चर अभी बाकी है... Asia Cup मध्ये भारत-पाकिस्तान आणखी दोनवेळा भिडणार, संपूर्ण 'गणित' समजून घ्या

गोव्यात दोन दिवस धुमाकूळ घालणारा 'ओंकार' अखेर महाराष्ट्रात दाखल; फटाके, बॉम्बच्या आवाजाने दणाणले जंगल

Gold Rate: सोन्याचे दर गगनाल भिडले! सणासुदीच्या काळात खरेदीला ब्रेक; मागणी तब्बल 'इतक्या' टक्क्यांनी घटण्याचा अंदाज

Margao: देवपूजेची फुले विसर्जनासाठी गेला अन् पाय घसरुन नदीत बुडाला; एक दिवसानंतर सापडला मृतदेह

Goa Live Updates: नीता कांदोळकर यांनी दिला सांगोल्डा ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाचा राजीनामा!

SCROLL FOR NEXT