Viresh Borkar Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: आरोप, कारस्थान आणि 'अदृश्य हात'... बोरकरांचा मोठा दावा; निवडणूक 'आरजी'मधूनच लढवणार असल्याचं केलं स्पष्ट

Revolutionary Goans Party: रिव्होल्युशनरी गोवन्स पक्षाचे आमदार वीरेश बोरकर यांनी गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर होणाऱ्या आरोपांना चोख उत्तर दिले आहे.

Sameer Amunekar

पणजी: रिव्होल्युशनरी गोवन्स पक्षाचे आमदार वीरेश बोरकर यांनी गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर होणाऱ्या आरोपांना चोख उत्तर दिले आहे. माझ्यावर आरोप करणारे पक्षातीलच काहीजण असून, या संपूर्ण प्रकरणामागे नक्कीच कोणीतरी ‘अदृश्य हात’ आहे. काही पदाधिकाऱ्यांना समोर करून हे राजकारण खेळले जात आहे, असा थेट आरोप आमदार बोरकर यांनी केला. तसेच आपण आपल्या भूमिकेवर ठाम असून आगामी निवडणूक ‘आरजी’ पक्षामधूनच लढवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

गेल्या काही दिवसांपासून वीरेश बोरकर यांच्या कथित बंगल्याबाबत पक्षांतर्गत उलट-सुलट चर्चा आणि आरोप केले जात होते. यावर मौन सोडत बोरकर यांनी आपली बाजू मांडली. आपल्यावरील आरोप फेटाळताना बोरकर म्हणाले की, माझा बंगला आहे, असा दावा पक्षातीलच काहीजण करत आहेत. तो बंगला कुठे आहे, काय आहे, हे आरोप करणाऱ्यांनाच ठाऊक! मला स्वतःला या कथित बंगल्याविषयी काहीच माहिती नाही.

आम्ही हा पक्ष गोमंतकीयांना आणि लोकांना एकत्र आणण्यासाठी, त्यांच्या हक्कासाठी स्थापन केला होता, याची आठवण करून देत बोरकर यांनी नाराजी व्यक्त केली. आज काही घटकांकडून पक्षाला वेगळ्या दिशेने नेण्याचे प्रयत्न होत आहेत. मात्र, आगामी निवडणूक मी रिव्होल्युशनरी गोवन्स पक्षातूनच लढवणार आणि लोकांसाठी काम करत राहणार, असा ठाम विश्वास त्यांनी शेवटी व्यक्त केला.

पक्ष एक शिस्तबद्ध यंत्रणा!

पक्षाकडून होणाऱ्या संभाव्य कारवाईबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, पक्ष ही एक शिस्तबद्ध यंत्रणा आहे. जर याप्रकरणी पक्षाकडून मला कोणतीही अधिकृत नोटीस आली, तर मी त्याला निश्चितपणे व रितसर उत्तर देईन. मी पक्षाच्या चौकटीत राहून काम करणारा कार्यकर्ता आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT