Goa Electricity: वीज ग्राहकांना दिलासा, वीजभार आपोआप वाढणार; अर्जाची गरज नाही

Goa Electricity Load Increase: राज्यातील वीज ग्राहकांना दिलासा देणारा महत्त्वपूर्ण निर्णय वीज खात्याने घेतला असून, १० किलोवॅटपर्यंत मंजूर वीजभार वाढविण्याची प्रक्रिया आता अधिक सुलभ करण्यात आली आहे.
Goa Electricity:
Goa ElectricityDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: राज्यातील वीज ग्राहकांना दिलासा देणारा महत्त्वपूर्ण निर्णय वीज खात्याने घेतला असून, १० किलोवॅटपर्यंत मंजूर वीजभार वाढविण्याची प्रक्रिया आता अधिक सुलभ करण्यात आली आहे.

नवीन कार्यपद्धतीनुसार, १० किलोवॅटपर्यंतचा वीजभार अनेक ग्राहकांसाठी विभागाकडून आपोआप वाढविण्यात येणार आहे. त्यामुळे ग्राहकांना स्वतंत्र अर्ज करण्याची गरज भासणार नाही, अशी माहिती मुख्य विद्युत अभियंता स्टीफन फर्नांडिस यांनी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर दिली.

Goa Electricity:
Goa Traffic Jam: मेरशी चौकात 'एआय'चा झाला पोपट! हायटेक सिग्नल यंत्रणेनं गोमंतकीयांचा केला खोळंबा; वाहनांच्या रांगाच रांगा

फर्नांडिस यांनी सांगितले की, सध्या एक-फेज वीजजोडणी असलेल्या ग्राहकांचा मंजूर वीजभार स्वयंचलितपणे ५ किलोवॅटपर्यंत वाढविण्यात येईल.

Goa Electricity:
Goa Lake Protection: "तलाव बुजवला तर अख्खा परिसर पाण्यात बुडणार!", सॅटेलाईट फोटोंनी उघड केलं दवर्लीतील 'ते' गुपित

मात्र, एखाद्या ग्राहकाला ५ किलोवॅटपेक्षा अधिक वीजभार आवश्यक असल्यास, त्यांना तीन-फेज वीजजोडणीत रूपांतर करणे अनिवार्य राहील. तसेच, १० किलोवॅटपेक्षा अधिक मंजूर वीजभार आवश्यक असलेल्या ग्राहकांना स्वतंत्रपणे अर्ज करून वीजभार वाढवून घ्यावा लागेल. अशा ग्राहकांना अर्ज करण्यासाठी तीन महिन्यांचा कालावधी देण्यात येणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com