Goa Assembly Elections: 'भाजपा'त निवडणुकीची लगबग; बी.एल. संतोष रविवारी गोव्यात ,संघटनात्मक तयारीला वेग

Goa BJP Election Preparations: भाजपने गेल्या काही आठवड्यांत संघटनात्मक पातळीवर हालचाली वाढवल्या आहेत.
Goa Assembly Elections
Goa BJP Election PreparationsDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी : विधानसभा निवडणूक मुदतपूर्व होण्याची शक्यता गृहीत धरून भारतीय जनता पक्षाने गोव्यातील संघटनात्मक तयारीला वेग दिला असून, पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस (संघटन) बी. एल. संतोष रविवारी गोवा दौऱ्यावर येणार आहेत.

भाजपने गेल्या काही आठवड्यांत संघटनात्मक पातळीवर हालचाली वाढवल्या आहेत. राज्य कार्यकारिणीची बैठक वर्षभरानंतर घेऊन निवडणूक तयारीला अधिकृत सुरवात करण्यात आली होती. त्यानंतर आता मंडळ प्रभारी, मंडळ अध्यक्ष, मतदारसंघ प्रभारी तसेच विविध मोर्चांच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठका सातत्याने आयोजित केल्या जात असून, प्रत्येक स्तरावरील तयारीचा आढावा घेतला जात आहे.

Goa Assembly Elections
Goa Assembly Election: 2027 मध्ये राज्यात पुन्हा भाजपच येणार, स्पष्ट बहुमत मिळणार! रोहन खंवटेंनी विरोधकांच्या 'भूलथापां'चा उडवला धुव्वा

भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामोदर नाईक यांनी संतोष यांच्या दौऱ्याबाबत बोलताना, राष्ट्रीय संघटन सरचिटणीस गोव्यात येणार असल्याची माहिती असल्याचे सांगितले. मात्र, त्यांच्या दौऱ्याचा सविस्तर कार्यक्रम अद्याप प्राप्त झालेला नसल्याने कोणत्या बैठका आयोजित करण्यात आल्या आहेत किंवा त्यात कोण सहभागी होणार आहेत, याबाबत सध्या भाष्य करणे शक्य नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, भाजपकडून विविध आघाड्या व मोर्चांच्या समित्यांची पुनर्रचना करण्याचे कामही वेगाने सुरू आहे. या समित्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर नव्या चेहऱ्यांना संधी दिली जात असल्याचे दिसून येत आहे. आगामी निवडणुकीत तरुण कार्यकर्ते आणि नव्या नेतृत्वाला संधी देण्याचा पक्षाचा प्रयत्न असल्याचेही पक्षातील सूत्रांचे म्हणणे आहे. तसेच गोवा दौऱ्यात बी.एल. संतोष हे या नव्या कार्यालयाच्या इमारतीची पाहणी करून कामाच्या प्रगतीचाही आढावा घेण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

Goa Assembly Elections
Ponda By Election: फोंड्यात निवडणुकीचे पडघम! दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला; कोणाची लागणार लॉटरी?

विविध घटकांना सज्ज ठेवण्यावर भर!

राजकीय वर्तुळात विधानसभा निवडणूक नोव्हेंबरच्या अखेरीस किंवा डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यानुसार बूथस्तरावरील यंत्रणा सक्रिय करणे व पक्षाच्या विविध घटकांना सज्ज ठेवण्यावर भाजपने भर दिल्याचे चित्र आहे.

याचबरोबर भाजपच्या नव्या प्रदेश कार्यालयाचे बांधकाम अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी या कार्यालयाचे उद्‌घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्याचे नियोजन पक्षाने केले असून, त्यावेळी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन उपस्थित राहतील, अशी माहिती सूत्रांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com