mla Viresh Borkar Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: ‘आरजीपी’तील अंतर्गत वादाबाबत आमदार बोरकरांची अप्रत्यक्ष पुष्‍टी; आल्‍मेदांवर कारवाईवर चर्चा सुरु असल्‍याचेही केले स्‍पष्‍ट

RG Party Expulsion News: आगशीचे पंच ज्‍युलियस आल्‍मेदा यांना पक्षातून काढल्‍यानंतर रिव्‍हॉल्‍यूशनरी गोवन्‍स पक्षात अंतर्गत धुसफूस सुरू झाल्‍याच्‍या ‘गोमन्‍तक’च्‍या वृत्ताला आमदार वीरेश बोरकर यांनी अप्रत्यक्षरित्या दुजोरा दिला.

दैनिक गोमन्तक डिजिटल

पणजी: आगशीचे पंच ज्‍युलियस आल्‍मेदा यांना पक्षातून काढल्‍यानंतर रिव्‍हॉल्‍यूशनरी गोवन्‍स पक्षात अंतर्गत धुसफूस सुरू झाल्‍याच्‍या ‘गोमन्‍तक’च्‍या वृत्ताला आमदार वीरेश बोरकर यांनी अप्रत्यक्षरित्या दुजोरा दिला. हा विषय पक्षांतर्गत असून, त्‍यावर चर्चेतून तोडगा काढण्‍यात येत असल्‍याचेही ते म्हणाले.

‘आगशीचे पंच ज्‍युलियस आल्‍मेदा यांना पक्षातून काढणे हा पक्षाचा अंतर्गत विषय आहे. त्‍याबाबत पक्षात चर्चा सुरू आहे. आल्‍मेदा यांना का काढण्‍यात आले? त्‍याबाबत आम्‍ही नंतर सविस्‍तर बोलू. सध्‍या मी विषयावर भाष्‍य करणार नाही’, असे आमदार बोरकर सोमवारी पत्रकारांशी बोलताना म्‍हणाले.

‘सर्वांना सोबत घेऊन आम्‍ही पुढे जात आहोत. पक्षांतर्गत घडणारे वाद चर्चा करून सोडवण्‍याचे प्रयत्‍न सुरू आहेत. याबाबत आपण ज्‍युलियस आल्‍मेदा यांच्‍याशीही चर्चा केलेली असून, त्‍यांच्‍याबाबत निश्‍चित तोडगा निघेल’, असेही बोरकर यांनी स्‍पष्‍ट केले.

काय आहे प्रकरण?

आगशीचे पंच असलेले ज्‍युलियस आल्‍मेदा हे ‘आरजीपी’चे कार्यकर्ते असल्‍याचे सांगण्‍यात येत होते. परंतु, काहीच दिवसांपूर्वी पक्षाने नोटीस जारी करीत आल्‍मेदा पक्ष सदस्‍य नाहीत. त्‍यांचा पक्षाशी काहीही संबंध नाही. ते पक्षाचे अध्‍यक्ष तसेच इतर पदाधिकाऱ्यांविरोधात वक्तव्‍ये करतात. त्‍यामुळे त्‍यांच्‍याशी संबंध ठेवणाऱ्या पदाधिकाऱ्यांवरही कारवाई करण्‍यात येईल, असे या नोटिशीत म्‍हटले होते.

या नोटिशीनंतर सांतआंद्रे मतदारसंघातील ‘आरजीपी’ कार्यकर्त्यांत पक्षाध्‍यक्ष परब यांच्‍याविरोधात संताप पसरलेला होता. त्‍यातच आल्‍मेदा हे आमदार बोरकर यांना जवळचे असल्‍याने बोरकर यांनीही या विषयावर भाष्‍य करणे टाळले होते.

याबाबत स्‍पष्‍टीकरण देण्‍यासाठी सांतआंद्रेतील ‘आरजीपी’ कार्यकर्त्यांनी परब यांना सांतआंद्रेत बोलावले होते. परंतु परब यांनी सांतआंद्रेत न जाता पणजीत बैठक बोलावली होती. पणजीतील बैठकीला उपस्‍थित राहण्‍यास कार्यकर्त्यांनी नकार दिलेला होता.

अखेर बोरकर यांनी त्‍यांची मनधरणी केल्‍यानंतर ते बैठकीला ते पणजीतील बैठकीला आले होते. परंतु, त्‍या बैठकीत कोणताही तोडगा निघालेला नव्‍हता. त्‍यामुळे आरजीपीत मनोज परब आणि वीरेश बोरकर असे दोन गट पडल्‍याच्‍या चर्चा सुरू झाल्‍या होत्‍या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Star Cricketer Retirement: ''मी लढाई हरलो...'', स्टार वेगवान गोलंदाजाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला ठोकला रामराम; सततच्या दुखापतींना कंटाळून घेतला मोठा निर्णय

Asian Games Final 2026: अजिंक्य टीम इंडियाची 'गोल्ड' कामगिरी! फायनलमध्ये भारतीय पोरींनी श्रीलंकेला 147 धावांनी लोळवलं; एशियन गेम्समध्ये भारताचा डंका

Women Cancer Symptoms : महिलांमध्ये सर्वाधिक आढळणारा कर्करोग कोणता? 'ही' लक्षणं दिसल्यास वेळीच तपासणी करा

Goa Ranji 2026: गोव्याच्या रणजी संघाची तयारी अंतिम टप्प्यात, स्पर्धेपूर्वी महाराष्ट्राविरुद्ध दोन सराव सामने; खेळाडूंच्या कामगिरीकडे लक्ष

Goa Rain Shortage: पाऊस न पडल्यास भातशेती धोक्यात; कणसे धरू लागल्याने दिवसातून किमान एक हलकी सर आवश्यक, कृषी संचालकांचा इशारा

SCROLL FOR NEXT