Viral Video Mapusa Goa Dainik Gomantak
गोवा

Mapusa: म्हापशात धक्कादायक प्रकार! गटारीत भरदिवसा नग्न अवस्थेत आंघोळ करणाऱ्या व्यक्तीचा व्हिडिओ व्हायरल

Viral Video Mapusa Goa: सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ तूफान व्हायरल होत. हा व्हिडिओ म्हापशातील असल्याचे सांगितले जात आहे.

Manish Jadhav

Viral Video Man Bathing In Drain Mapusa Goa

म्हापसा: सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ तूफान व्हायरल होत. हा व्हिडिओ म्हापशातील असल्याचे सांगितले जात आहे. या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती रस्त्याच्या बाजूला असलेल्या गटारीत नग्न अवस्थेत आंघोळ करत असल्याचे दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून हा व्यक्ती दररोज रस्त्याच्या बाजूला असलेल्या या गटारीत आंघोळ करत असल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात आले.

काय आहे नेमकं प्रकरण?

मागील काही दिवसांपासून म्हापशातील (Mapusa) गांधी सर्कल ते पर्रा रस्त्यावर असलेल्या गटारीत एक व्यक्ती नग्न अवस्थेत अंघोळ करत आहे. नग्न अवस्थेत आंघोळ करणाऱ्या या व्यक्तीला एका स्थानिक नागरिकाने जाब विचारला असता तो म्हणाला की, रस्त्यावरुन येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांनी मी अंघोळ करत असल्याचे दिसत नाही. दरम्यान, अशा धक्कादायक प्रकारावर स्थानिकांकडून रोष व्यक्त होत आहे. काही स्थानिकांनी शेजारी असणाऱ्या पोलिस ठाण्यात धाव घेतली. अशा या धक्कादायक प्रकारावर पोलिसांनी (Police) तात्काळ दखल घ्यावी अशी मागणी स्थानिकांनी केली.

म्हापशात संताप व्यक्त होतोय

म्हापशातील हा धक्कादायक प्रकार पाहून लोक संताप व्यक्त करत आहेत. जोपर्यंत अशा लोकांची खोड मोडली जात नाही तोपर्यंत असे प्रकार थांबणार नाहीत असे एका स्थानिकाने म्हटले. तर एका महिलेने म्हटले की, अशा लोकांमुळे गोव्याची संस्कृती बदनाम होत आहे. या रस्त्यावरुन महिलाही प्रवास करतात. हे खरंच धक्कादायक आहे. अशा लोकांवर तात्काळ कारवाई करण्यात यावी अशी मागणी मी पोलिसांकडे करते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Uttar Pradesh Crime: हिंदू मुलींच्या बेकायदेशीर धर्मांतरणासाठी 1,000 हून अधिक मुस्लिम तरुणांना द्यायचा पैसे; छंगूर बाबाबाबत मोठा खुलासा!

Viral Video: फिटनेस आणि टायमिंगचं परफेक्ट उदाहरण! खेळाडूनं गरुडासारखी झेप घेत पकडला भन्नाट कॅच, व्हिडिओ एकदा बघाच

Sattari Ganja: सत्तरीत गांजा पोचला कसा? 'तो' ड्रग्स पॅडलर कोण? Special Report Video

Operation Sindoor: पाकिस्तान भारताविरुद्ध अण्वस्त्रांचा वापर करणार होता? शाहबाज शरीफ यांनी स्पष्टच सांगितलं

John Cena: 'You Can't See Me' आता शेवटचं? जॉन सीनाचं WWE मधील फेअरवेल मॅच लीक, 'या' वर्ल्ड चॅम्पियनविरुद्ध होणार सामना

SCROLL FOR NEXT