Viral Garba video Goa airport Dainik Gomantak
गोवा

Viral Video: नवरात्रीसाठी फ्लाईटमुळे उशीर झाला गुजराती प्रवाशांनी 'गोवा' विमानतळावरच सुरु केला गरबा; पायलट, हवाई सुंदरीही थिरकल्या Watch

Goa Airport Viral Video: नवरात्रीचा उत्सव सुरु असल्याने सर्व प्रवाशांना वेळेत सुरुत गाठायची होती पण, फ्लाईट वेळेत न आल्याने प्रवाशांनी संताप व्यक्त केला.

Pramod Yadav

पणजी: सध्या देशभर नवरात्रीचा उत्सव जोरदार सुरु आहे. महाराष्ट्र, गुजरात, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, राजस्थानसह देशाच्या विविध राज्यात दुर्गादेवीचा उत्सव मोठ्या आनंदात साजरा केला जातो. याच काळात गुजरातमध्ये गरबा खेळला जातो, गुजराती गरबा देशभर खेळला जातो शिवाय विविध ठिकाणी असणारे गुजराती लोक आनंदाने गरबा खेळतात. दरम्यान, गोवा विमानतळावर घडलेली घटना सध्या सर्वत्र चर्चेत आहे.

गोव्यातून गुजरातला जाणारी फ्लाईटला सुमारे पाच तास उशीर झाला आणि वैतागलेल्या गुजराती प्रवाशांनी थेट विमानतळावरच गरबा खेळण्यास सुरुवात केली. विशेष म्हणजे गरबा खेळत असलेल्या या प्रवाशांसोबत विमानतळावरील वैमानिक आणि हवाई सुंदरीही थिरकल्या. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वाऱ्यासारखा व्हायरल होत आहे. नवरात्रीचा उत्सव सुरु असल्याने सर्व प्रवाशांना वेळेत सुरुत गाठायची होती पण, फ्लाईट वेळेत न आल्याने प्रवाशांनी संताप व्यक्त केला.

मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर गोव्यातील मोपा विमानतळावरून रविवारी सायंकाळी पाच वाजता सुरतला विमान जाणार होते. दरम्यान, तांत्रिक अडचणीमुळे फ्लाईटला येण्यास सुमारे पाच तासांचा विलंब झाला. गोव्यातून मोठ्या संख्येने सूरतला जाणारे प्रवासी प्रामुख्याने नवरात्र उत्सवासाठी जाणार होते. पण, फ्लाईट उशीराने आल्याने प्रवाशांनी थेट विमानतळावरच ठेका धरला. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे.

व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये प्रवाशांनी गोल करुन गाण्यावर ठेका धरला आहे. यात प्रवासी गाण्यावर टाळ्या वाजवताना देखील दिसत आहे. विशेष म्हणजे यात फ्लाईटचे वैमानिक आणि हवाई सुंदरीही सामिल झाले आहेत. यावेळी विमानतळावरील इतर प्रवासी फ्लाईटसाठी वाट पाहत असून, गरबा पाहण्याचा आनंद घेताना दिसतायेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: धक्का लागताच मेट्रोत दोन महिलांमध्ये तुफान हाणामारी, केस ओढत एकमेकींना बदडले; व्हायरल व्हिडिओ पाहून यूजर्स म्हणाले, 'रिअ‍ॅलिटी शो पेक्षाही डेंजर'

शिक्षण विभागाचा मोठा निर्णय! गोव्यात विद्यार्थ्यांचा प्रवास आता अधिक सुरक्षित; बस चालकांसाठी 'पोलीस व्हेरिफिकेशन' बंधनकारक

Surya Gochar 2026: 11 जानेवारीपर्यंत सूर्य देवाची विशेष कृपा! 'या' 3 राशींच्या नशिबात राजयोग; सोन्यासारखे चमकतील दिवस!

Konkan Tourism: गर्दीपासून दूर, निसर्गाच्या कुशीत! नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी कोकणातील 'ही' 5 शांत ठिकाणं आहेत बेस्ट

घराजवळ चर्च आहे का? गोव्यात घर घेतल्यानंतर अर्शद वारसीच्या सासू-सासऱ्यांनी त्याला पहिला प्रश्न काय विचारला? VIDEO

SCROLL FOR NEXT