आशिया चषकाच्या फायनलमध्ये पाकिस्तानची नांगी ठेचल्यानंतर 'सूर्यकुमार' गोव्यात, क्रिकेट मैदानाचे करणार उद्घाटन

Suryakumar Yadav In Goa: चिखलीचे सरपंच कमलाप्रसाद यादव यांच्या संकल्पनेतून खासगी मैदान उभारण्यात आले आहे.
Suryakumar Yadav to inaugurates cricket ground Goa
Suryakumar Yadav in GoaDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: दुबईत रविवारी रात्री पाकिस्तानला धूळ चारुन आशिया करंडक जिंकणाऱ्या भारतीय टी-२० संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव याच्या आगमानची उत्सुकता गोमंतकीयांना आहे.

'३६० डिग्री' फलंदाजीसाठी विख्यात असलेला सूर्यकुमार याला मंगळवारी (ता. ३०) वेर्णा औद्योगिक वसाहतीतील '१९१९ स्पोर्टस' क्रिकेट मैदानाच्या उद्घाटनास विशेष अतिथी या नात्याने निमंत्रण आहे.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत या मैदानाचे उद्घाटन करतील. रविवारी रात्री स्पर्धा जिंकल्यानंतर 'करंडकाविना' जल्लोष केलेल्या भारतीय संघातील खेळाडूंचे सोमवारी मायदेशी आगमन झाले.

Suryakumar Yadav to inaugurates cricket ground Goa
Sulakshana Sawant: 'मुख्यमंत्र्यांच्या पत्नीची बदनामी करणं थांबवा'! कोर्टाने घातला लगाम; संजय सिंह यांना मोठा धक्का

चिखलीचे सरपंच कमलाप्रसाद यादव यांच्या संकल्पनेतून खासगी मैदान उभारण्यात आले आहे. लोटली पंचायत क्षेत्रात हे मैदान साकरण्यात आले असून, त्याची ५,००० एवढी आसन क्षमता आहे. हे मैदान ७९ यार्ड जागेत बांधले आहे. यात एकूण नऊ खेळपट्ट्या तयार करण्यात आली आहे.

आशिया चषकात पाकिस्तानसोबत झालेल्या तिन्ही सामन्यात पाकिस्तानचा दारुण पराभव झाला. आशिया चषक स्पर्धेत पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळण्यावरून देखील मोठे राजकारण पाहायला मिळाले.

दरम्यान, अंतिम सामन्यात पाकिस्तानचा पराभव झाल्यानंतर चषक न देता नख्वी यांनी मैदानावरुन पळ काढला होता. यामुळे क्रीडाविश्वातून खंत व्यक्त करण्यात आली. खेळात राजकारण घेऊन येऊ नये असे मत क्रीडा विश्वातून व्यक्त करण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com