Sky lanternArtist : सासष्टी, प्रत्येक सणासुदीच्या वेळी काही ना काही तरी खास आकर्षण असते. चतुर्थीत गणेशमूर्तीला महत्त्व असते, तसेच दीपावलीत आकाश कंदिलांना महत्त्व आहे. दीपावलीच्या काळात प्रत्येक हिंदूंच्या घराबाहेर आकाश कंदील टांगलेले असतो.
पूर्वी लोक आकाशकंदील स्वतः घरी तयार करायचे. अजूनही काही घरांमध्ये ही प्रथा चालू आहे. मात्र अनेक लोक आकाशकंदील विकत घेतात.
आके, मडगाव येथील कलाकार विराज मडकईकर हा आकाश कंदील तयार करून विकतो. मूळ मडकई येथील कविराज आपल्या चतुर्थीच्या वेळी आपल्या मुळ गावी जाऊन गणेशमूर्तीही तयार करतो.
विराजने सांगितले की, लहानपणापासून आपल्याला कलेची आवड आहे. गेल्या १५ वर्षांपासून आपण आकाशकंदील तयार करतो व विकतो. आपण वेगवेगळ्या आकाराचे आकाशकंदील तयार करतो. राम, गणेश अशा वेगवेगळ्या पद्धतीचे आकाशकंदील तयार करतो.
२०० पेक्षा जास्त आकाशकंदील बनविले जातात. आकाशकंदील तयार करणे ही एक कला आहे. लोकांना परवडेल अशाच किमतीत आपण आकाश कंदील विकत असतो, असे मडकईकर यांनी सांगितले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.