VIP Number Plate Dainik Gomantak
गोवा

Bardez Rto : फॅन्सी, व्हीआयपी नंबरमुळे बार्देश आरटीओ ‘मालामाल’; वर्षभरात मिळवला 6.30 कोटी रुपयांहून अतिरिक्त महसूल

Bardez Rto : २१७३ क्रमांकांचे वितरण

गोमन्तक डिजिटल टीम

Bardez Rto : म्हापसा, आपल्या कार किंवा दुचाकी वाहनाला फॅन्सी नंबर असावा, अशी अनेक वाहनप्रेमींची इच्छा असते. अनेक वाहनप्रेमी फॅन्सी वा त्यांच्यासाठी शुभ असलेल्या ‘लकी नंबर’साठी मोठी रक्कम मोजायलाही तयार असतात.

याच व्हीआयपी व फॅन्सी नंबर शुल्कातून बार्देश आरटीओ कार्यालयाने गतवर्षी नोव्हेंबरपर्यंत तब्बल ६.३० कोटी रुपयांहून अधिक महसूल मिळवला असून २,१७३ हून अधिक व्हीआयपी नंबर देण्यात आले आहेत.

सध्या ग्राहकांमध्ये व्हीआयपी नंबरची बरीच क्रेझ असून त्यांना त्यांच्या वाहनांसाठी विशेष पसंती क्रमांक हवा असतो. आपल्या हौसेसाठी ग्राहक वर्ग लागेल तेवढे शुल्क भरण्यास तयार असतात, अशी माहिती आरटीओ विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. नोंदणी क्रमांकासाठी अधिसूचनेनुसार शुल्क ठरवले जाते. निवडलेल्या मालिकेनुसार वाहन क्रमांकासाठी शुल्क आकारले जाते.

जर एकाच क्रमांकासाठी अधिक अर्ज आल्यास सर्वाधिक बोली लावणाऱ्याला तो क्रमांक मिळतो. काही ग्राहक नोंदणी क्रमांक त्यांच्या आयुष्यातील विशेष दिवस म्हणून किंवा जन्मकुंडली किंवा अंकशास्त्रानुसार भाग्यवान क्रमांक वगैरे काढतात आणि तो नंबर घेण्याकडे अनेकांचा कल असतो.

काही लोक आपल्या आवडीच्या क्रमांकासाठी एक तर प्रतीक्षा करतात किंवा नोंदणी मालिकेचा मागोवा ठेवतात. पण बरेच लोक त्यांना अपेक्षित असलेला क्रमांक मिळविण्यासाठी अतिरिक्त खर्च करण्यास मागे-पुढे पाहात नाहीत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT