mobile tower Dainik Gomantak
गोवा

शिवोलीत ‘टॉवर’चे काम ग्रामस्थांनी रोखले

टॉवरला तीव्र विरोधासाठी एक-दोन दिवसांत ठोस कार्यक्रम ठरविण्यात येईल,अशी माहिती यावेळी उपस्थितांनी दिली.

दैनिक गोमन्तक

कळंगुट: एका मोबाईल कंपनीकडून शिवोलीतील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या परिसरात मोबाईल टॉवर उभारण्याचा प्रयत्न होत असल्याचे लक्षात येताच संतप्त ग्रामस्थांनी टॉवरसाठी चाललेले खोदकाम रोखले. यावेळी मजुरांनी तेथून पळ काढल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.दरम्यान, टॉवरला तीव्र विरोधासाठी एक-दोन दिवसांत ठोस कार्यक्रम ठरविण्यात येईल,अशी माहिती यावेळी उपस्थितांनी दिली.

(Villagers stopped the work of 'Tower' in siolim)

दरम्यान, राज्यात सध्या पंचायत निवडणुकांची तयारी चाललेली असतांना स्थानिक पंचायत मंडळाच्या अनुपस्थितीत आरोग्य केंद्राच्या आवारात टॉवर उभारण्याचा प्रयत्न हाणून पाडू, असे ग्रामस्थांनी सांगितले.

शिवोलीतील प्राथमिक आरोग्य केद्राच्या आवारात उभारण्यात येत असलेल्या मोबाईल टॉवरशी स्थानिक आरोग्य केंद्राचा काडीचाही संबंध नाही. टॉवरला स्थानिकांचा विरोध असल्यास संबंधित मोबाईल कंपनी तसेच सरकारने कायदेशीर मार्गाने यावर तोडगा काढावा. ग्रामस्थांनीही हा वाद सबुरीने सोडवावा.

-डॉ. साधना शेट्ये,

(शिवोलीच्या आरोग्याधिकारी)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lessons from Animals: प्राण्यांकडूनही शिकता येतात जीवनाचे धडे! मुंग्यांची शिस्त, पक्ष्यांची मेहनत अन् निसर्गाची जादू

Bangladesh Resort Fire: बांगलादेशात रिसॉर्टला भीषण आग, 10 जणांचा होरपळून मृत्यू; जीव वाचवण्याची संधीच मिळाली नाही VIDEO

Trigrahi Yog 2026: ग्रहांच्या फेरबदलाचा मोठा चमत्कार! त्रिग्रही आणि बुधादित्य योगाच्या संयोगाने उजळणार 3 राशींचे भाग्य; होणार अफाट धनलाभ

INS Samarthak Warship: भारताची पहिली बहुउद्देशीय युद्धनौका 'समर्थक' नौदलात दाखल; सागरी सुरक्षा होणार अधिक मजबूत!

Hero च्या दोन नव्या बाइक्स लॉन्च! किंमत 1.27 लाखांपासून सुरू, क्रूझ कंट्रोलसह मिळणार अनेक भन्नाट फीचर्स

SCROLL FOR NEXT