Sewerage Project Dainik Gomantak
गोवा

उंडीर मलनिस्सारण प्रकल्पाला ग्रामस्थांचा विरोध, प्रत्यक्ष येऊन पाहणी करा अन्यथा...

उंडीर-बांदोडा येथील मलनिस्सारण प्रकल्पाचे काम सुरू करण्यापूर्वी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री नीलेश काब्राल यांनी प्रत्यक्ष उंडीर भागात येऊन पाहणी करावी उंडीरवासीयांची मागणी

दैनिक गोमन्तक

उंडीर-बांदोडा येथील मलनिस्सारण प्रकल्पाचे काम सुरू करण्यापूर्वी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री नीलेश काब्राल यांनी प्रत्यक्ष उंडीर भागात येऊन पाहणी करावी आणि ग्रामस्थांच्या शंकांचे निरसन करूनच मग कामाला सुरवात करावी. अन्यथा आमचा या प्रकल्पाला कायम विरोध असेल, असे उंडीरवासीयांनी सांगितले.

या प्रकल्पासंबंधीची एक सभा येत्या रविवार, ३ सप्टेंबर रोजी सायंकाळी ४ वाजता म्हारू देवस्थानात होणार असल्याचे सांगण्यात आले.

उंडीर-बांदोडा येथे लोकवस्तीनजीकच मलनिस्सारण प्रकल्प येत असून लोकांना त्रासदायक ठरू पाहणाऱ्या या प्रकल्पाची जागा, लोकांची घरे आणि लोकांचे वास्तव्य याचा आधी सरकारी यंत्रणेने विचार करावा, अशी मागणी स्थानिकांनी केली. गेला बराच काळ उंडीरवासीयांचा या मलनिस्सारण प्रकल्पाला विरोध राहिला आहे,

त्यामुळे मुख्यमंत्री, सार्वजनिक बांधकाममंत्री तसेच सरकारी यंत्रणेने आधी आमच्या प्रश्‍नांची उत्तरे द्यावीत, मगच प्रकल्प बांधकामाची कार्यवाही सुरू करावी, असे उंडीरवासीयांनी सांगितले.

आंदोलनात सगळे गावाबाहेरील

उंडीर प्रकल्पविरोधातील आंदोलनात गावातील चार मुले सोडली तर अन्य कोणीच नाही. आंदोलनात सगळे गावाबाहेरील आहेत. हा प्रकल्प तेथे उभारायचा ठरला तेव्हा कुंडईकर नावाच्या एका जमीनदाराकडून ३३ हजार चौरस मीटर शेतजमीन जी खुशाली नाईक व बंधू कसत होते; पण ३०-३५ वर्षे पडिक होती ती या प्रकल्पासाठी जमीनमालक व कुळाकडून घेण्यात आली.

मलनिस्सारण प्रकल्प तेथे उभारायचा आहे, त्याशिवाय सभागृह, स्वयंसेवी संस्थांसाठी एक आस्थापन असावे, अशीही योजना त्यामागे होती. त्यावेळी काही ग्रामस्थ रस्त्यावर आले. न्यायालयात प्रकरण पोहोचले. तेथे प्रकल्पाच्या बाजूने न्यायालयाचा निकाल लागला. त्यानंतर राष्ट्रीय हरित लवादाकडे प्रकरण पोहोचले. तेथेही हिरवा कंदील मिळाला. पाच वर्षे त्यानंतर गेली आता कामधंदा नसलेला एक पक्ष हस्तक्षेप करत आहे. हे काम लोकांसाठी आहे. त्याच्यासाठी सर्व परवानग्या घेतल्या आहेत, असे वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: अतिक्रमणे हवटण्यासाठी राबवण्यात येणार विशेष मोहीम; रुमडामळ ग्रामसभेत ठराव!

Benaulim: बाणावलीची जागा काँग्रेसच लढणार; निंबाळकरांनी विधानसभा निवडणुकीबाबत केले मोठे विधान

Goa Crime: वेश्या रॅकेट चालवणाऱ्या टोळीतील चौथा आरोपी अटकेत; गोवा पोलिसांनी आवळल्या मुसक्या

Blitz Chess Tournament: ब्लिट्झ स्पर्धेत एथन वाझचा डंका! पुन्हा अपराजित कामगिरी

CM Pramod Sawant: युवकांनी FIT INDIA साठी एकत्र यावे; साखळी युवा उत्सव उद्‌घाटनावेळी मुख्यमंत्र्यांचे आवाहन

SCROLL FOR NEXT